Jalgaon News : रायसोनी महाविद्यालयात ‘उडी उडी जायें...’! पतंग महोत्सव रंगला

डिपार्टमेंट ऑफ मॅनॅजमेट व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विभागातर्फे मकरसंक्रांतीच्या औचित्याने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात एकूण ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
Students participating in Kite Festival at Raisoni College.
Students participating in Kite Festival at Raisoni College.esakal
Updated on

Jalgaon News : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ मॅनॅजमेट व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विभागातर्फे मकरसंक्रांतीच्या औचित्याने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात एकूण ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (Kite Festival was held at Raisoni College jalgaon news)

पतंग महोत्सवामुळे संपूर्ण महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक पेहराव परिधान केला तसेच पतंगावर विविध सकारात्मक स्लोगन्स लिहून समाज प्रबोधन करण्यात आले.

उपक्रमाचे उद्‌घाटन संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आले. अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व विविध विभागातील विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात कुकिंग विदाउट फायर, पतंग बनवा व रांगोळी यासारख्या विविध स्पर्धाचे आयोजन देखील करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख व बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे व प्रा. नैना चौधरी यांनी केले.

Students participating in Kite Festival at Raisoni College.
Yeola Kite Festival : नयनरम्य आतषबाजीने पतंगोत्सवाला अलविदा

स्पर्धेतील विजेते असे

पतंग बनवा स्पर्धा : प्रथम - धनश्री जाधव, द्वितीय - चंदन शिंपी, तृतीय - लोकेश चौधरी

रांगोळी स्पर्धा : प्रथम - देवयानी प्रवीण पाटील, द्वितीय - वैष्णवी नितीन पाटील, तृतीय - खुशी मोतीराम तिवारी

कुकिंग विदाउट फायर : प्रथम - मामोनी मैती आणि सानिया आहुजा, द्वितीय - लोकेश तलरेजा, तृतीय - नुपूर जोशी

Students participating in Kite Festival at Raisoni College.
Kite Festival in Pune: पुणेकर लुटणार पतंगबाजीचा आनंद ! गीता जयंती निमित्त पतंग महोत्सव अन् आनंद मेळाव्याचे आयोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.