Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था पावसाळा सुरू होताच वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतील. शासकीय, निमशासकीय स्तरावर अनेकदा वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. (Know the proper method of planting tree jalgaon news)
यात अनेक सामाजिक संस्थाचाही हिरीरीने सहभाग असतो. मात्र, ही झाडे लावताना शास्त्रशुद्ध पद्धतीने लावली, तर निसर्गही चांगला बहरेल अन् आपल्याला सावली सोबत श्वासोश्वासासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनही मिळेल, असा सल्ला वृक्षप्रेमी, अभ्यासकांनी दिला आहे.
वृक्षारोपण करायचे तर मनापासून वृक्ष लावा, ते वाढवा अन् त्याच्यापासून मिळणाऱ्या सावली अन् ऑक्सिजनचा आनंद घ्या, असाही सल्ला वृक्षप्रेमींनी दिला आहे. वृक्षलागवड, संवर्धनाचे प्रमाण वाढले, वृक्षलागवड चळवळ झाली तरच तापमानाचा उच्चांक कमी होईल.
वृक्षारोपणाचे उपक्रम पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आवश्यकही आहेत. आवड म्हणून आपणही घरी झाडे लावतो, पण अनेकदा ही झाडे जगत नाहीत किंवा पाहिजे तशी जोमाने वाढत नाही.
कारण कोणती झाडे कुठे, कधी आणि कशी पद्धतीने लावली पाहिजे, अशी माहिती वृक्षप्रेमी, सेंद्रीय शेती अभ्यासक सतीश खरे यांनी दिली. जमिनीचा कस पाहून योग्य प्रकारची झाडे लावलयास ती वाढतील. जोमाने अन् पर्यावरणाचा समतोल साधतील, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जमिनीनुसार ‘ही’ झाडे लावावी
करडी व काळी जमीन : सिरस, कडुनिंब, अंजन, सुबाभूळ, करंज, आंबा, निलगिरी, शेवगा
दगडमिश्रित खडबडीत जमीन : सागवान, बांबू, खेर, चिंच, सीताफळ, बाभूळ, आंबा
चुनखडीयुक्त जमीन : सिरस, बाभूळ, आंबा, सीताफळ, चिंच
रेताळ जमीन : खैर, सिरस, करंज, कडुनिंब
चिकनमातीयुक्त जमीन : हिवर, बाभूळ, महारुख, सिरस, जांभूळ
रोप लावण्याची योग्य पद्धत कोणती
-रोप लावण्यासाठी आधी दीड फूट खोल, तेवढाच रुद्र खड्डा खोदून सर्व माती आणि दगड काढून घ्यावेत
-रोप खड्यात ठेवून त्यात शेणखत, सुपीक माती समप्रमाणात घेऊन खड्डा जमिनीच्या पातळीपर्यंत पूर्ण भरून घ्यावा
-हलक्या हाताने माती दाबून रोपाला पाणी द्यावे. नर्सरीतून आणलेले रोप प्लॅस्टिक पिशवीत असते. ते प्लॅस्टिक अलगद काढावे, जेणेकरून आतील माती सलग राहून मुळे तुटणार नाहीत
-रोप शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी लावावे
कोणती झाडे कुठे लावावी
-रस्त्याच्या दुतर्फा : छाया देणारी डेरेदार वृक्ष, जलद व प्रतिकूल परिस्थितीत वाढणारे, वाहतुकीला अडथळा न येण्याइतके उंच वाढणारे वृक्ष. यात वड, कडुनिंब, आंबा, कुसूम, निलगिरी, करंज, गुलमोहर, पेल्टोफोरम, बाभूळ, अमलतास, अंजन, विलायती चिंच, जांभूळ, चिंच, पिंपळ, बेहडा, अर्जुन
-शोभेसाठी : गुलमोहर, पळस, कदंब, कांचन, अमलतास, जॅकरांडा, नागचाफा, सोनचाफा, शंकासूर, निलगिरी, अशोक, चंदन
-शेताच्या बांधावर : अंजन, चिंच, बकान, बाभूळ, विजा, बोर, वड, शिरस, सुबाभूळ, पिंपळ
-कुंपणासाठी उपयुक्त : एरंड, चिल्लार, मैदी, विलायती बाभूळ
-धार्मिक स्थळाजवळ : अर्जुन, आंबा, उंबर, कदंब, कवठ, कांचन, चाफा, पारिजातक, बकुळ, बेल, रुद्राक्ष, वड, पिंपळ, सोनचाफा, चंदन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.