Kojagiri Purnima : यंदा कोजागिरीला खंडग्रास चंद्रग्रहण; विरळ- गडद सावलीच्या छायेचा अनुभव

 kojagiri purnima Khagras Lunar Eclipse is on 28th oct jalgaon news
kojagiri purnima Khagras Lunar Eclipse is on 28th oct jalgaon newsesakal
Updated on

Kojagiri Purnima : खगोलीय घटनांमधील महत्त्वपूर्ण असे खंडग्रास चंद्रग्रहण शनिवारी (ता. २८) आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहणाचा अद्‌भूत खगोलीय नजारा अनुभवण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. पुढे दोन वर्षांनी ७ सप्टेंबर २०२५ ला खग्रास चंद्रग्रहण अनुभवता येईल. (kojagiri purnima Khagras Lunar Eclipse is on 28th oct jalgaon news)

शनिवारी (ता. २८) रात्री ११ वाजून ३१ मिनिटांनी चंद्र आधी पृथ्वीच्या विरळ सावलीला स्पर्श करेल. त्यानंतर हळूहळू तो गडद सावलीच्या दिशेने जाईल. रविवारी (ता. २९) मध्यरात्री १ वाजून ०५ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीला स्पर्श करेल आणि खंडग्रास चंद्रग्रहणास सुरवात होईल.

चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीच्या अगदी काठावरुन जात असल्याने मध्यरात्री १ वाजून ४४ मिनिटांनी चंद्राचा सहा टक्के भाग ग्रासला जाईल. त्यामुळे हे ग्रहण आपल्याला खंडग्रास स्वरूपात दिसेल. वेळ जाईल तसा तो गडद सावलीतून विरळ सावलीत जायला लागेल. मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांनी चंद्र पूर्णपणे विरळ सावलीत आलेला असेल. ३ वाजून ५६ मिनिटांनी चंद्र विरळ सावलीतून बाहेर निघेल आणि चंद्रग्रहण संपेल.

 kojagiri purnima Khagras Lunar Eclipse is on 28th oct jalgaon news
Kojagiri Purnima 2023 : कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या मुहूर्त आणि तिथी

खंडग्रास चंद्रग्रहण शनिवारी (ता. २८) रात्री ११ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होऊन ते रविवारी (ता. २९) मध्यरात्री ३ वाजून ५६ मिनिटांपर्यंत असेल. संपूर्ण ग्रहण हे एकूण ४ तास २५ मिनिटांचे असेल आणि मुख्य खंडग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी १ तास १७ मिनिटांचा असेल. या कालावधीत चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत असेल.

"ग्रहण ही एक नैसर्गिक अदभूत खगोलीय घटना आहे. जी नेहमी होत नाही. या दिवशी योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा आहे. सर्वांनी चंद्र प्रकाशात दुधाचा आनंद घेत, कोणतेही समज-गैरसमज मनात न ठेवता खंडग्रास चंद्रग्रहाणाचा आनंद घ्यावा." - अमोघ जोशी (खगोल अभ्यासक)

 kojagiri purnima Khagras Lunar Eclipse is on 28th oct jalgaon news
Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचं असणार चंद्रग्रहण; ग्रहणकाळात ‘या’ गोष्टी करणे टाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.