Jalgaon Workers Strike : ऊसतोड मजुरांचे आजपासून ‘कोयता बंद’ आंदोलन

राज्यात ज्या ज्या ठिकाणी ऊस तोडणी सुरु असेल त्या त्या ठिकाणी तोडणीचे काम बंद राहील.
'Koyta Bandh' movement of sugarcane workers from today jalgaon labourers strike news
'Koyta Bandh' movement of sugarcane workers from today jalgaon labourers strike newsesakal
Updated on

Jalgaon Workers Strike : ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरात २०१९ नंतर अद्यापपर्यंत वाढ झालेली नसल्याने ही मजुरी किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढवावी अशी मागणी असताना या मागणीची दखल घेतली जात नसल्याने राज्यातील ऊसतोड मजुरांनी सोमवारपासून (ता. २५) ‘कोयता बंद’ आंदोलन पुकारले आहे.('Koyta Bandh' movement of sugarcane workers from today jalgaon strike news)

त्यामुळे राज्यात ज्या ज्या ठिकाणी ऊस तोडणी सुरु असेल त्या त्या ठिकाणी तोडणीचे काम बंद राहील, अशी माहिती ऊस तोडणी मजूर व मुकादम संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील ढोमणेकर यांनी दिली. श्री. ढामणेकर म्हणाले,‘ राज्यातील ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरवाढीच्या कराराचे नूतनीकरण होऊन वर्ष उलटले तरी त्यांना दरवाढ झालेली नाही.

वास्तविक दर तीन वर्षांनी मजुरीच्या दरामध्ये वाढ केली जाते. २०१९ नंतर ही दरवाढ झालेली नसल्याने राज्यातील १५ लाखांहून अधिक ऊसतोड मजुरांवर अन्याय होत आहे. ही दरवाढ ५० टक्क्यांनी करावी अशी या मागणीसाठी उद्यापासून (ता. २५) राज्यात सर्वत्र ऊस फडांमध्ये कोयता बंद आंदोलन केले जाणार आहे.

दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. दरवर्षी महागाई वाढते मग त्या तुलनेत कारखानदार व शासन मजुरी का वाढवत नाहीत? ‘ऊसतोडणी कामगार महागाईच्या वणव्यात घरावर तुळशीपत्र ठेवून कमीत कमी सहा महिने आपल्या लहान मुलांसह ज्येष्ठांना घेऊन घरापासून कोसो दूर ऊसतोडणीसाठी जातात.

त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीमुळे त्यांचे पोट भरत नसल्यामुळे हा घटक आजही हलाखीचे जीवन जगत आहे. यातून या कष्टकरी वर्गाला बाहेर काढण्यासाठी त्यांचाच कष्टाचा घामाचा मोबदला दरवर्षी महागाईवर आधारित द्यावा, अशी आपली मागणी आहे. साखर संघाकडून देखील दरवाढीबाबत अनास्था दाखवली जात आहे.

'Koyta Bandh' movement of sugarcane workers from today jalgaon labourers strike news
Dhule Labor Shortage: शेती करावी की नको? न्याहळोदसह परिसरात मजुरांची टंचाई

वास्तविक, शेजारच्या गुजरात राज्यात मजुरीचे दर अधिक आहे, ते देऊ शकतात तर महाराष्ट्रात का वाढीव मजुरी दिली जात नाही. त्यामुळे आपल्या राज्यातील मजूर ऊसतोडणीसाठी परराज्यात जात आहे. त्याचा फटका साखर कारखान्यांच्या गाळपावर देखील होत असल्याने ऊसतोड मजुरीच्या दरात वाढ करावी, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

गोपीनाथ मुंडे यांची आठवण

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असताना त्यांनी ऊसतोड मजुरांच्या संदर्भात कधीही असा अन्याय होऊ दिला नव्हता. मुंडे असताना दरवर्षी नियमानुसार ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरात वाढ होत होती. आता मात्र मजुरांना त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी लढावे लागत असल्याची दुर्दैवी वेळ आल्याचे सांगत किशोर पाटील ढोमणेकर यांनी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अशी आहे संघटनेची मागणी

ऊसतोडणी मजुरीचे एकूण चार प्रकार आहेत. यात यंत्राने वगळता डोकी सेंटरसाठी २७३ रुपये प्रती टन, बैलगाडी सेंटरसाठी ३०४ रुपये प्रती टन, टायर असलेल्या बैलगाडीसाठी २३७ रुपये प्रती टन असे सध्या दर दिले जातात.

यात ५० टक्क्यांची वाढ करून कराराचे तत्काळ नुतनीकरण करावे. नुतनीकरण झाल्यानंतर अनुक्रमे ४०९, ४५६ व ३५५ रुपये प्रती टन अशी वाढ होणार असून हिच प्रामुख्याने आमची मागणी असल्याचे किशोर पाटील ढोमणेकर यांनी सांगितले.

'Koyta Bandh' movement of sugarcane workers from today jalgaon labourers strike news
Jalgaon Strike News : तहसीलदार, नायब तहसीलदारांचा संप मिटला! कामाला सोमवारपासून गती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()