यावल (जि. जळगाव) : तालुका कृषी विभागामार्फत (Agriculture Department) २५ जून ते १ जुलैदरम्यान ‘कृषी संजीवनी मोहीम’ (Krushi Sanjeevani mohim) राबविण्यात आली. याअंतर्गत नुकतेच कोळवद येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत ‘खत बचत दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी पी. टी. चोपडे, सेंद्रिय शेती तज्ज्ञ यांनी ‘सेंद्रिय शेती’बाबत सखोल मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. (Krishi Sanjeevani Mohim by Department of Agriculture in Yaval Jalgaon News)
कृषी सल्लागार महेश पाटील यांनी जमीन आरोग्य पत्रिकेबाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे यांनी ‘कृषीक ॲप’ जमिन आरोग्य पत्रिकेबाबत माहिती देऊन सर्वांनी कृषिक ॲप डाऊनलोड करण्याबाबत आव्हान केले. Iffco कंपनीचे संजीव पाटील यांनी नॅनो युरियाबाबत माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नॅनो युरियाचे वाटप केले. मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सर्व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधवांचे आभार मानले. कार्यक्रमावेळी उपस्थित शेतकऱ्यांना जीवामृत प्रात्यक्षिक करून दाखविले. जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले.
बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. उपस्थित महिला भगिनींना भाजीपाला किट वाटप करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. तोरवणे, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री. हिवराळे, कृषी पर्यवेक्षक श्री. शेकोकारे, कृषी सहायक श्री. निंबोळकर, श्री. जाधव, आत्मा तसेच इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.