Jalgaon News : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे सर्वाधिक उंचीचे अनेक जागतिक विक्रम नावावर असलेल्या पुणे येथील कुळकर्णी परिवाराची जाहीर मुलाखत शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सहाला टेलिफोन ऑफिसजवळील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात घेण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राजेश वेद व कार्यक्रम समितीप्रमुख डॉ. जयंत जहागीरदार यांनी पत्रकाद्वारे दिली. (Kulkarni Family which have Holding many world records for highest height Interview on 21 april jalgaon news)
पुणे येथील शरद कुळकर्णी (७ फूट २ इंच) व संज्योत कुळकर्णी (६ फूट २ इंच) या जोडप्याची १९८९ मध्ये सर्वाधिक उंचीचे पती-पत्नी म्हणून विक्रमी नोंद झाली आहे. २०१२ मध्ये त्या दोघांसह त्यांच्या मुली मृगा व सानिया या चौघांच्या नावाने सर्वाधिक उंचीचा परिवार या विक्रमांची नोंद झाली आहे. दोन्ही मुलींची उंची सहा फूटापेक्षा अधिक आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
शरद कुळकर्णी स्टेट बँकेतील निवृत्त व्यवस्थापक असून, ते बॉस्केट बॉल खेळाडू आहेत. विक्रमवीर कुळकर्णी परिवाराची जळगावातील ही पहिलीच मुलाखत आहे. कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला असून, मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन रोटरीचे मानद सचिव गिरीश कुळकर्णी व जनसंपर्क समितीप्रमुख सुबोध सराफ यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.