Jalgaon News : मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू

laborer
laboreresakal
Updated on

यावल (जि. जळगाव) : विहिरीत गाळ काढण्यासाठी उतरलेल्या मजुराच्या अंगावर मातीचा (Soil) ढिगारा पडल्याने त्याखाली दबून गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. १७) घडली. (laborer died after being buried under pile of mud jalgaon news)

मुबारक रमजान तडवी असे या मृत मजुराचे नाव असून तो हिंगोणा (ता. यावल) येथील रहिवासी आहे. याबाबत फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, हिंगोणा येथील मजूर मुबारक रमजान तडवी (वय ३२) हा शुक्रवारी (ता. १७) शेतकरी हुना चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील शेतातील विहिरीमधील गाळ काढण्याच्या कामासाठी गेलेला होता.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

laborer
Rate Hike : टीव्‍ही पाहाण्यासाठी 30 टक्‍के जादा पैसे; चॅनल बंद पडण्याची शक्‍यता

रात्री एकच्या सुमारास तो विहिरीवर काम करीत असताना मुबारक तडवीच्या अंगावर मातीचा ढिगारा पडून त्या खाली दबून गुदमरून त्याचा दुदैवी मृत्यू झाला. याबाबत शेतमालक हुना चोपडे यांनी दिलेल्या माहितीवरुन फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. मृत मुबारक तडवी यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

मुबारक तडवी हा त्याच्या घरातील कमावता एकमेव व्यक्ती होता. त्याच्या मजुरीवरच त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता. शासनातर्फे त्यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

laborer
Jalgaon News : नगरदेवळ्यातील बसफेऱ्या पूर्ववत करा प्रवाशांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()