Jalgaon : पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन ई-पीक नोंदणी

E- Peek
E- Peek esakal
Updated on

जळगाव : एकविसाव्या शतकात वाटचाल करताना शेतकऱ्यांना आता नवनवीन तंत्रज्ञानाची ओढ लागली आहे. व्हॉट्सॲप, मोबाईल, यूट्यूब, फेसबुकचे युग आहे. शेती करताना नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होईल याकडे शेतकरी लक्ष देत आहेत.

आपल्या पिकांची ई-पीक नोंदणी करण्यात राज्यात जिल्हा अव्वल ठरत आहे. आतापर्यंत पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन ई-पीक नोंदणी केली आहे. तीन लाख ८४ हजार ९८७.२८ हेक्टर क्षेत्रावरील ई-पीक नोंद पूर्ण केली आहे.

गेल्या वर्षापासून शासनाच्या महसूल, कृषी विभागातर्फे ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या वर्षी १ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबरदरम्यान दोन लाख ७६ हजार ६७४ खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली.

यात तीन लाख ८६ हजार ७९४ हेक्टर ३१ आर क्षेत्रापैकी तीन लाख ८४ हजार ९८७ हेक्टर २८ आर सातबारावरील ई-पीक नोंदणी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात तीन लाख ९१ हजार २६१ हेक्टर ९ आर क्षेत्रापैकी चार हजार ४६६.७८ हेक्टर क्षेत्र कायम पडीत म्हणून नोंद आहे. या वर्षी १८०७.०८ हेक्टर क्षेत्राची चालू पडीत म्हणून नोंद झाली आहे.(Lakh amount of farmers have registered online e-Peek Jalgaon News)

E- Peek
Dasara Melava : दसरा मेळाव्यापूर्वी नाशिकमध्ये मधुशाला

तर पीककर्ज मिळण्यात अडचणी

जिल्ह्यातील शेतकरी खातेदारांनी मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंद वेळेत पूर्ण करावी. पीक पाहणी नोंद करण्यात अडचणी असल्यास संबंधित तलाठ्यांची मदत घ्यावी. पीक पाहणी नोंद पूर्ण करू न शकल्यास शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमीन पडीत म्हणून नोंद होईल. आगामी काळात पीककर्ज मिळविण्यात अडचणी येऊ शकतील. बेमोसमी पाऊस, अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई मिळण्यासह अन्य शासकिय योजनांचा लाभ मिळण्यासदेखील अडचणी येऊ शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित वेळेत ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ई-पीक नोंदणी १५ ऑक्टोबरपर्यंत

शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सोपे, सुलभ व्हावे यासाठी मोबाईल ॲपची सुधारित आवृत्ती-२ ई-पीक पाहणी विकसित करण्यात आली आहे. हे सुधारित मोबाईल ॲप १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. खरीप हंगामातील पीक पाहणी १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना क्रमांक १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहेत.

E- Peek
असे राष्ट्रपती देशाला ना मिळो म्हणत, राष्ट्रपती मुर्मूंवर उदित राज यांची टीका

तालुकानिहाय ई-पीक नोंदणी

जळगाव-- १४ हजार ८३२

अमळनेर-- २८ हजार ४०५

एरंडोल-- १२ हजार ४१२

चाळीसगाव--३१ हजार ५११

चोपडा--२४ हजार ७३०

जामनेर-- ३० हजार ७१४

धरणगाव-- १३ हजार २८९

पाचोरा-- २५ हजार १३३

पारोळा-- २१ हजार ८६८

बोदवड--५ हजार १९२

भडगाव-- १४ हजार २१४

भुसावळ-- ७ हजार ८९१

मुक्ताईनगर- ८ हजार ७३१

यावल-- १६ हजार ७९२

रावेर-- २१ हजार ७५२

एकूण : दोन लाख ७७ हजार ४६६

E- Peek
XXX वेब सिरीजमध्ये सुपर बोल्ड सीन देणारी ती अभिनेत्री कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.