Jalgaon News : पंचायत समिती कार्यालय की वाहनतळ? अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी

large number of vehicle parked in front panchayat samiti jalgaon news
large number of vehicle parked in front panchayat samiti jalgaon news
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील मिनी मंत्रालय म्हणून पंचायत समिती कार्यालयाकडे बघितले जाते. मात्र याच कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच दुचाकीची मोठी रीघ लागलेली दिसते.

त्यामुळे हे पंचायत समिती कार्यालय आवार आहे की दुचाकींचे वाहनतळ अशी संभ्रमावस्था निर्माण होते. अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (large number of vehicle parked in front panchayat samiti jalgaon news)

राष्ट्रीय महामार्गावर असलेले पंचायत समिती कार्यालयात विविध प्रकारचे शेतकरी व ग्रामस्थांशी निगडित असलेले विभाग आहेत. या कार्यालयांत येणाऱ्यांची दररोज मोठी वर्दळ असते. परंतु प्रवेशद्वारावरच अस्ताव्यक्त दुचाकी लावल्याचे ओंगाळवाणे चित्र दृष्टीस पडते. परिणामी, येथे कामासाठी येणाऱ्यांची मोठी अडचण होते.

या गंभीर समस्येकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी होते. याबाबत ‘सकाळ’चाही पार्किंगबाबत पाठपुरावा सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

large number of vehicle parked in front panchayat samiti jalgaon news
Jalgaon Rain News : जळगावसह जिल्ह्यात ‘वरुण’कृपा; महिन्याच्या खंडानंतर पावसाचे सुखद आगमन

परंतु थातुरमातूर कारवाई केल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती पंचायत समिती आवारात दिसून येत असल्यामुळे याबाबत अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाबरोबर बेशिस्त पार्किंगबाबत कर्मचाऱ्यांना सूचना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, आज विविध विभागांची चौकशी केली असता संबंधित विभागाचे बरेचसे अधिकारी विना अर्ज रजेवर दिसून आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पंचायत समितीचा कारभार रामभरोसे तर नाही ना अशी चर्चा रंगली होती.

large number of vehicle parked in front panchayat samiti jalgaon news
Jalgaon News : पारोळा तालुक्यात आता पाचऐवजी सात महसुली मंडळे; शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात होणार फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.