Jalgaon Crime: एमआयडीसी पोलिसांच्या नाकर्तेपणात ‘एलसीबी’ने मारली बाजी; संशयित ‘साहेबा'मुळे निसटले

Jalgaon Crime: एमआयडीसी पोलिसांच्या नाकर्तेपणात ‘एलसीबी’ने मारली बाजी; संशयित ‘साहेबा'मुळे निसटले
Updated on

Jalgaon Crime : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिलवाडी खून प्रकरणात मध्यप्रदेशातून दोन मारेकऱ्यांना अटक करून गुन्हा उघडकीस आणला. गुन्हा घडला त्याचदिवशी बीट उपनिरीक्षकांनी तपासाला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे बिलवाडीचा भावी सरपंच प्रवीण पाटील हा सहा महिन्यांपूर्वी एमआयडीसी पोलिसांना वाळूचोरीच्या गुन्ह्यात सापडला होता.

पण त्याची ‘रिमांड' न घेताच जामिनावर त्याची सुटका झाल्याने तो निसटला. दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्याची संधी एमआयडीसी पोलिसांना चालून आली होती. मात्र, खुनाच्या गुन्ह्यात वाट चुकवली. ‘लूज सुपरवीजन’मुळे प्रवीण पाटील आल्या तोऱ्यात निघून गेला. (lcb solved 3 serious cases of jalgaon crime news)

जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी बुधवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत बिलवाडी रखवालदार खून प्रकरण, निंभोरा खून प्रकरण आणि ४० पेक्षा अधिक घरफोड्या करणारा ‘भावी सरपंच' प्रवीण सुभाष पाटील (रा.बिलवाडी) या तीन गंभीर प्रकरणांची उकल करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक करून गुन्ह्यांची नेमक्या कशा पद्धतीने उकल झाली, याची माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची घटनास्थळावरून तपास चक्रे फिरवली. गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून घटना कळताच तपासाला सुरुवात केली.

त्यातून तीन क्लिष्ट गुन्ह्याची उकल गुन्हे शाखेच्या पथकाने करून संशयितांना अटक केली. तपास पथकातील वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील, सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, प्रितम पाटील, प्रमोद लाडंवजारी, किरण धनगर यांच्या पथकाने दोन्ही खुनाच्या गुन्ह्यांसह जिल्ह्यातील ४० घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली.

बिलवाडी रखवालदाराचा खून

जळगाव-पाचोरा रोडवरील वावडदा येथे ईश्वर मन्साराम पाटील यांच्या शेतातील रखवालदार पांडुरंग पंडित पाटील (वय ५२, रा. बिलवाडी) यांचा मंगळवारी (ता. १४ नोव्हेंबर) मध्यरात्री खून झाला होता. म्हसावद बीटच्या कर्मचाऱ्यांनी खुनाच्या गुन्ह्यातील संशयित पवन बहादीर बारेला (वय ३०) व त्याचा शालक वाधरसिंग शोभाराम बारेला (वय २४) असे दोघे बेपत्ता असल्याने पवनच्या वडिलांना ताब्यात घेत त्यांच्या वडिलांची चौकशी सुरू केली.

संशय आल्याने पवनच्या वडिलांसमवेत एका पावरा तरुणाला घेऊन पवनच्या मागावर निघणार इतक्यात तांत्रिक तपासावर अवलंबून असलेल्या ‘साहेबां'नी त्यांना थांबवून एरंडोलच्या अट्टल गुन्हेगारांचा समावेश असल्याचे सांगत तपास वाहनाला दुसरीकडे वळवले. परिणामी, मध्यप्रदेशातील आदिवासी तांड्याचा रोष पत्करून २४ तास उलटल्यावर अटक केलेले संशयित पवन बारेला व त्याचा शालक निघाला.

Jalgaon Crime: एमआयडीसी पोलिसांच्या नाकर्तेपणात ‘एलसीबी’ने मारली बाजी; संशयित ‘साहेबा'मुळे निसटले
Jalgaon Crime: घरफोड्यांच्या पैशांवर गाव पाटीलकीचा रुबाब पडला महागात; सरपंच होण्यासाठी चोऱ्यांची मालिका

‘भावी सरपंचा'चे बिंग फुटले असते...

तब्बल ४० घरफोड्यांची कबुली देणारा ‘भावी सरपंच' प्रवीण सुभाष पाटील (वय ३१) याला गुन्हे शाखेने बिलवाडी रखवालदाराचा तपास सुरू असताना टिपले होते. खात्री झाल्यावर त्याला उचलले होते. हा प्रवीण पाटील जून-जुलैमध्ये वाळू चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांच्या हाती लागला होता. त्याचा रुबाब, निवडणुकीतील पैशांची वाटप पाहता, तेव्हा त्याच्यावर संशय बळावला होता. मात्र तेव्हा त्याला नावापुरती कागदावर अटक करून ‘रिमांड' न घेता न्यायालयात हजर केल्याने त्याची जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर त्याने घरफोडीचा धंदा वाढवला.

पोलीस कोठडीत रवानगी

घरफोड्यांच्या गुन्ह्यातील अटक संशयित प्रवीण सुभाष पाटील याला पाचोरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यांची जंत्री पाहता न्यायालयात प्रवीणला विचारण्यात आले की, २० गुन्ह्यांची कबुली दिलीय. खरयं का? त्यावर प्रवीणने होकार दिला.

मुद्देमाल किती जप्त? या प्रश्‍नाला २० लाख ३० हजारांचा असे उत्तर तपासाधिकाऱ्यांनी दिले. पैसे कुठे ठेवले होते? या प्रश्‍नावर प्रवीणने पोलिसांना दिल्याचे सांगताच पोलिसांना घाम फुटला. कुणाला? या प्रतिप्रश्नावर एलसीबीला घरझडतीतून पैसे काढून दिल्याचे प्रवीणने सांगितले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत रवाना केले.

विजयसिंग पाटील यांच्याकडून कथन

बिलवाडी रखवालदार खून, निंभेारा खून आणि घरफोडीच्या गुन्ह्यात प्रवीण पाटीलला अटक करणाऱ्या पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक विजयसिंग पाटील यांना गुन्हेगार कसे पकडले हे सांगण्याची संधी आज पोलीस अधीक्षकांनी दिली. त्यावर विजयसिंग पाटील म्हणाले, की दिवाळीच्या सुटी मंजूर होऊन भाऊबिजेसाठी बहिणीकडे निघाला असतानाच निंभोरा खुनाची घटना घडल्याने निरीक्षक किशन नजन पाटील यांनी माघारी बोलावून घेतले.

Jalgaon Crime: एमआयडीसी पोलिसांच्या नाकर्तेपणात ‘एलसीबी’ने मारली बाजी; संशयित ‘साहेबा'मुळे निसटले
Jalgaon Crime News : दिवाळीच्या सुटीत चटाई कंपनीसह इलेक्ट्रिक दुकान फोडले

मात्र तो गुन्हा हातोहात उघडकीस येत नाही, तोवर बिलवाडीचा खून झाला. या गुन्ह्याच्या तपासात गावातून माहितीचे संकलन करताना ‘पुढाऱ्या'च्या तोऱ्यात प्रवीण पाटील भेटला. इकडच्या-तिकडच्या गप्पा मारताना त्याच्या संशयाची पूर्वकल्पना आल्याने गावात कट्यावर बसणाऱ्या तरुणांना प्रवीणबद्दल विचारणा केली.

ती माहिती अन्‌ त्याच्या चकचकीत कारवर देवा ग्रुपचे स्टिकर पाहिले होते. भाऊबिजेला बहिणीकडे गेलो असताना आमच्याकडे खून घरफोड्या होताय.पोलीस काही करत नाही, असे रडगाणे कानी पडले. गावातील सीसीटव्ही फुटेज एकाकडे पाहिले. त्यात पांढरी स्वीफ्ट दिसली. त्यावरील पुसटशा स्टिकर वरून खात्री होताच, प्रवीणला धरले.

तोरा काही जाईना!

प्रवीणला ताब्यात घेतल्यावर ‘मला का आणलंय? असा प्रतिप्रश्न ‘भावी सरपंचाच्या' तोऱ्यातच त्याने विचारला. ‘माझे घर पूर्ण ए.सी., चकचकीत कार, हाताशी वाहने मी सरपंचपदाचा उमेदवार अन्‌ तुम्हाला घरफोड्या वाटतो का’ असा रुबाब त्याने दाखवला. त्यावर चौकशीत विजयसिंग पाटील व पथकाने ‘हे बघ प्रवीण एक तर, तू सांग थोडक्यात निपटेल...’ असं सांगूनही त्याचा रुबाब कमी होईना.

तांत्रिक विश्लेषकांसह सीसीटीव्ही फुटेज त्याला दाखवल्यावर त्याने एका रात्रीतील ६ घरफोड्यांची कबुली दिली. मात्र पोलिसांना अधिकची माहिती असल्याने त्याला सर्व पुरावे दाखवताच त्याने एका मागून एक अशा ४० घरफोड्या कबूल केल्या असून १७३ ग्रॅम सोनं, १ स्वीफ्ट कार, १ मोटारसायकल आणि रोकड रक्कम पोलिसांना काढून दिली.

Jalgaon Crime: एमआयडीसी पोलिसांच्या नाकर्तेपणात ‘एलसीबी’ने मारली बाजी; संशयित ‘साहेबा'मुळे निसटले
Jalgaon Crime News : तलाठ्याच्या अंगावर घातले ट्रॅक्टर; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.