जळगाव : काम सोडून कंपनीतच टाकला डाका; भोपाळ येथून कामगाराला अटक

arrested
arrested sakal
Updated on

जळगाव : शहरातील एमआयडीसी तील कंपनीच्या गोडावूनचे कुलूप तोडून कार्यालयातील दीड लाख रुपयांची रक्कम चोरीची घटना गुरुवारी (ता. १०) घडली. पोलिसांत गुन्हा दाखल होऊन कंपनीत काही दिवसांपूर्वी कामावर असलेल्या कामगाराला भोपाळ येथून अटक करण्यात आली आहे.

एमआयडीसीतील जी-२० सेक्टरमधील जय भोले नावाच्या कंपनीचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कार्यालयामधील लॉकरचे कुलूप तोडून लॉकरमधील १ लाख ५२ हजार ५०० हजारांची रोकड व मोबाईल चोरुन नेल्याची घटना गुरुवारी घडली होती. एमआयडसी पोलिसांत याप्रकरणी अमर दयालदास कटारिया यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याच्या तपासाअंती कंपनीत काम करणाऱ्या कामगार यांना विचारपूस करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी कंपनीत काम करणारा भीमकुमार परमहंश यादव याला चोरीची सवय असून तो काम सोडून गेला असल्याची माहिती सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना माहिती मिळाली होती.

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील हेमंत कळसकर, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील यांना भोपाळ रवाना करण्यात आले. पथकाने संशयित भीमकुमार याचा मागोवा घेतला असता त्याला भोपाळमधील पुजा कॉलनीतून ताब्यात घेतले.

चोरीची रक्कम पाठविली घरी

संशयित भीमकुमार यादव याची कसून चौकशी केली असता, त्याने आपणच कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेली रक्कम त्याने घरी पाठविली असल्याचेदेखील सांगितले. संशयिताला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला बुधवार (ता. १६)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.