जळगावच्या नेतृत्वाची कसोटी मुंबईच्या मैदानात

Girish mahajan & Eknath Khadse
Girish mahajan & Eknath Khadseesakal
Updated on

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सद्या माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या वर्चस्वाची लढाई आहे. मात्र आता त्यांची खऱ्या अर्थाने कसोटी मुंबईच्या विधानपरिषदेच्या (Legislative Council) मैदानात दिसून येणार आहे. (Legislative Council elections Mumbai eknath Khadse Girish Mahajan Jalgaon political news)

एकनाथ खडसे यांनी भाजपतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन यांच्याकडे जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व आले. भाजपतील जिल्ह्यातील निर्णय त्यांच्या माध्यमातूनच होत असतात. जळगाव महापालिका निवडणुकीत त्यांनीच नेतृत्व करून पक्षाचा झेंडाही फडकविला होता. मात्र कालांतराने भाजपमध्ये फूट पडली आणि त्यांची सत्ता गेली. जिल्हा बँक निवडणुकीतही गिरीश महाजन यांनी बहिष्कार टाकून भाजपच्या संचालकपदाच्या उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी भाजप, राष्ट्रवादी आमने-सामने येणार आहेत. यात भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

पण आता त्या अगोदर मुंबईतील विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात ही लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देवून मैदानात उतरविले आहे. ही निवडणूक बिनविरोध न करता भाजपने आपला पाचवा उमेदवार मैदानात उतरवून ही निवडणूक अटीतटीची केली आहे. यात पाचव्या उमेदवारासाठी खरी लढत कॉंग्रेस व भाजपत असली तरी भाजपाचा खरा निशाना एकनाथ खडसे हेच असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्या मताचा कोटा पाहिल्यास राष्ट्रवादीचे खडसे यांना निवडून आणण्यासाठी केवळ तीन मताची अधिक आवश्‍यकता आहे. शिवसेनेकडे अतिरिकत मते आहेत. ती मते मिळाल्यास त्यांचा विजय अवघड नाही, शिवाय खडसे यांचे इतक्या वर्षाची राजकीय कारकिर्द पाहता त्यांचे भाजपसह सर्वच पक्षात सौदार्हाचे संबंध आहेत.

त्यामुळे त्यातूनही काही मते त्यांना मिळू शकतात, परंतु भाजपने गुप्तमतदान पध्दतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतात फूट पाडून ही मते आपल्या पदरात पाडून घेतल्यास खडसे यांचा घात होवू शकतो असेही सांगितले जात आहे. खडसे यांचा पराभव हाच भाजपच्या रणनीतीचा मोठा विजय असणार आहे. राज्यसभा निवडणुकीत संजय पवार टार्गेट ठेवून भाजपने खरा निशाना संजय राऊत यांच्यावर लावला होता. मात्र ते थोडक्यात बचावले अगदी असाच सापळा खडसे यांच्यासाठी लावण्यात येवू शकतो. त्यामुळेच भाजपचे अनिल बोडे म्हणाले, ‘‘भाई’ किंवा ‘भाऊ’ कोणीही एक पराभूत होवू शकतो.

Girish mahajan & Eknath Khadse
‘त्याने' कुटुंबीयांना घडविले पालखीचे लाइव्ह दर्शन

गिरीश महाजनांची खेळी

भाजपने या रणनीतीसाठी ज्या तीन जणांवर जबाबदारी सोपविली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांचाही सामावेश आहे. राज्यसभा निवडणुकीतही महाजन यांच्याकडे जबाबदारी होती, त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. आता विधानपरिषदेही आपण यश मिळविणारच अशी घोषणा त्यांनी केली आहे. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद संपूर्ण राज्याला माहिती आहे. फडणवीस यांचे विश्‍वासू गिरीश महाजन आहेत. त्यातच खडसे यांचे जिल्ह्यातील वर्चस्व महाजनांनाही नको आहे. आगामी काळात भाजपला खडसे अडचणीचे ठरणार आहेत. त्यामुळे भाजप खडसे यांना पराभूत करण्यासाठी खेळी आखतील हे निश्‍चित आहे. या रणनितीत गिरीश महाजन असणार आहेत, ते यशस्वी होतात. की महाविकास आघाडीचे बळ आणि ४५ वर्षाचा राजकीय अनुभव या ताकदीवर खडसे आपला विजय संपादन करतात हेच २० तारखेच्या निवडणूक निकालात दिसून येईल.

Girish mahajan & Eknath Khadse
Nashik : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोलवर 54 रुपयांची सूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.