नंदुरबार : ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षणातून पाणी नियोजनाचे धडे

जलजीवन मिशन : २५ गावांतील सदस्यांना चार दिवस क्षेत्रभेटीसह दिले प्रशिक्षण
Lessons water planning through training Gram Panchayat members
Lessons water planning through training Gram Panchayat memberssakal
Updated on

नंदुरबार : जलशक्ती मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद व नवनिर्माण संस्थेतर्फे जिल्ह्यातील २५ गावांतील प्रत्येकी पाच सदस्यांना प्रत्येकाला शुद्ध व मुबलक पाणी मिळण्याच्या नियोजनासह क्षमतावृद्धीविषयी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी चारदिवसीय प्रशिक्षणातून धडे दिले.

Lessons water planning through training Gram Panchayat members
वन नेशन-वन रजिस्ट्रेशन; जमिनीचे वाद आणि बनावट खरेदीपत्रं रोखण्यास होणार मदत

प्रशिक्षणात सदस्यांना मिळाले याविषयी मार्गदर्शनपाण्याचे नियोजन, पाण्याचा स्रोत प्रकटीकरण, जलजीवन मिशनची संकल्पना, पारंपरिक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, नळजोडणी, त्याचे फायदे व परिणाम, जलजीवन मिशन अंतर्गत मिळणाऱ्या वेगवेगळ्या संधी, ग्रामपंचायतीची भूमिका, जबाबदाऱ्या, सरपंच, पाणी समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांची भूमिका, पाणी गुणवत्तेचे महत्त्व, सहभागी संसाधनांचा वापर, पाणी संसाधन नकाशे, पाण्याचे स्रोत बळकटीकरण, पाण्याचे अंदाजपत्रक, गावातील पाणीपुरवठा सेवा सुविधा, प्रत्येक माणसाला ५५ लिटर पाणी नळाद्वारे मिळावे म्हणून त्याच्या योजना जलजीवन मिशनच्या माध्यमाचे मार्गदर्शन करण्यात आले.

Lessons water planning through training Gram Panchayat members
राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर

श्रीरामपूर व आसाणे येथे क्षेत्रभेटीतून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याठिकाणी सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्या सुविधा व स्रोत बळकटीकरणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती ग्रामस्थांनी दिली. पाणी समितीचे कामकाज, देखभाल-दुरुस्तीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी बांधकाम गुणवत्ता, गावातील सार्वजनिक काम सुरू असताना, गुणवत्ता व पारदर्शकता असावी, या गोष्टीकडे पाणी समिती व गावकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर गटचर्चेद्वारे सादरीकरण करण्यात आले.

तज्ज्ञ प्रशिक्षक

यशदा प्रशिक्षित प्रशिक्षक श्रीमती छाया भट, दिनेश पाटील, सृष्टी कन्स्ट्रक्शनचे मंदार वैद्य, वैशाली म्हस्के, प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, जिल्हा परिषदेचे पाणी गुणवत्तातज्ज्ञ नितीन पाटील, कार्यकारी अभियंता पांडुरंग दरेवार, सरपंच आसाणे, नवनिर्माण संस्थेचे प्रशिक्षक रवी गोसावी, राजेश ईशी, पाणी फाउंडेशनचे तात्या भोसले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे गौतम शिरसाठ यांनी प्रशिक्षण दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, पाणी व स्वच्छता मिशन प्रकल्प संचालक रवींद्र शिंदे, विजय गवळी, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक डॉ. वर्षा फडोळ, मनुष्यबळ विकासतज्ज्ञ विशाल परदेशी आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी नवनिर्माण संस्थेचे संजय वळवी, भूमिका भगत, मनीषा पाडवी, कौशल्या चौरे, पूजा शर्मा, भूषण साळुंके, दिलीप पावरा आदींनी परिश्रम घेतले.

या गावांतील सदस्यांना प्रशिक्षण

नंदुरबार तालुक्यातील आसाणे, सुतारे, श्रीरामपूर, न्याहली, दापूर, मांजरे, पिंपरी, नवापूर तालुक्यांतील लहान कळवण, बोरपाडा, खोकसा, कामोद, केळी, तर दुसऱ्या टप्प्यात नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द, हरिपूर जळके, बाल आमराई, वडझाकण, ढेकवद, ठाणेपाडा, नवागाव, केसरपाडा, वाघाळे, अजयपूर, शिरवाडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.