Jalgaon Bribe Crime : 7 हजारांची लाच घेताना ग्रंथपालास अटक; करगाव आश्रमशाळेतील प्रकार

Jalgaon Bribe Crime : 7 हजारांची लाच घेताना ग्रंथपालास अटक; करगाव आश्रमशाळेतील प्रकार
Updated on

Jalgaon Crime News : आश्रमशाळेत नोकरीला असलेल्या तक्रारदाराची कालबद्ध वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारताना करगाव (ता. चाळीसगाव) येथील माध्यमिक आश्रमशाळेतील ग्रंथपाल यास जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

श्रीकांत गुलाब पवार असे संशयित ग्रंथपालाचे नाव आहे. (Librarian arrested for accepting bribe jalgaon crime news)

करगाव आश्रमशाळेत नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्याची कालबद्ध वेतनश्रणी मंजूर करून आणण्यासाठी आश्रमशाळेतील ग्रंथपाल पवार (वय ३८) यांनी या अगोदर ‘फोन पे’वर तक्रारदाराकडून १५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक येथून पदोन्नतीची थकीत रक्कम ८५ हजार ५१९ रुपये मंजूर करून आणून देतो.

त्यासाठी फरक बिलाच्या १६ टक्क्यांप्रमाणे पंचासमक्ष बारा हजारांच्या लाचेची मागणी करून याचा पहिला हप्ता म्हणून सात हजार रुपये स्वतः स्विकारले. त्याचवेळी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी संशयित पवार यांच्या विरोधात येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon Bribe Crime : 7 हजारांची लाच घेताना ग्रंथपालास अटक; करगाव आश्रमशाळेतील प्रकार
Jalgaon Bribe Crime : साडेनऊ लाखांच्या कामासाठी लाखाची लाच; अभियंत्याविरुद्ध चौकशीअंती गुन्हा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्यासह सुनील वानखेडे, बाळू मराठे, राकेश दुसाने, एन. एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.

वरिष्ठ अधिकारी रडारवर

प्राप्त माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेल्या संशयित श्रीकांत पवार यांच्याकडे समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांशी करण्यात येणाऱ्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. त्यामुळे पवार हे या प्रकरणात केवळ मध्यस्थीच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागातील काही अधिकारी देखील आता पोलिसांच्या रडारवर असून त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

Jalgaon Bribe Crime : 7 हजारांची लाच घेताना ग्रंथपालास अटक; करगाव आश्रमशाळेतील प्रकार
Nashik Bribe Crime: वीजमीटर बसवून देण्यासाठी 7 हजारांची घेतली लाच; वाडीवऱ्हेच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह दोघांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.