Jalgaon News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात गर्भवती महिलेस जीवदान

After giving life to a pregnant woman at the Government Medical College, hospital, Principal Dr. Girish Thakur etc.
After giving life to a pregnant woman at the Government Medical College, hospital, Principal Dr. Girish Thakur etc.esakal
Updated on

जळगाव : गरोदर महिलेची प्रसूती झाल्यानंतरदेखील महिलेचा रक्तस्राव थांबत नव्हता. अशा गुंतागुंत परिस्थितीमध्ये स्त्रीरोग विभागाच्या डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेऊन गरोदर महिलेची गर्भपिशवी काढून तिला जीवदान दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (जीएमसी) गरोदर महिलेला प्रसूतीदरम्यान धोक्यात आलेला जीव वाचविण्यात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या पथकाला यश आले आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत संबंधित महिला रुग्णाला नुकताच रुग्णालयातून निरोप देण्यात आला. (Life of pregnant woman saved in Government Medical College Hospital Jalgaon News)

जळगावमधील २७ वर्षीय विवाहिता प्रसूतीसाठी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दाखल झाली होती. विवाहितेला यापूर्वी प्रसूतीच्या कारणास्तव दोन वेळा सीझर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. यंदा त्यांच्यावर तिसरी सीझर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. प्रसूती झाल्यानंतरदेखील संबंधित गरोदर महिलेचा रक्तस्राव थांबत नव्हता.

सीझरदरम्यान असे आढळून आले, की तिची गर्भपिशवी आतडे हे एकमेकांना चिकटलेले होते. सीझरदरम्यान तिला अतिरक्तस्राव होत होता. त्यामुळे तिची गर्भपिशवी काढावी लागली. त्यादरम्यान तिला चार रक्ताच्या बॅगा चढविण्यात आल्या व ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी तब्बल चार तास लागले.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

After giving life to a pregnant woman at the Government Medical College, hospital, Principal Dr. Girish Thakur etc.
Kamgar Kalyan Natya Spardha : खऱ्या मैत्रीचा अर्थ सांगणारी नाट्यकृती फ्रेंडशिप

महिलेचा जीव वाचल्यामुळे महिलेच्या नातेवाइकांनी वैद्यकीय यंत्रणेचे आभार मानले.
महिला रुग्णाला अधिष्ठाता डॉ. ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून महिलेला निरोप देण्यात आला.

महिलेवर उपचार करण्याकामी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राच्या सहाय्यक प्रा. डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. प्रदीप लोखंडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. प्रणिता खरात यांच्यासह शस्त्रक्रिया गृहइन्चार्ज नीला जोशी, इन्चार्ज परिचारिका रत्नप्रभा पालीवाल आदींनी सहकार्य केले.

After giving life to a pregnant woman at the Government Medical College, hospital, Principal Dr. Girish Thakur etc.
Nashik Crime News : सिडकोत देहव्यापार; एकास अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.