Amalner Marathi Sahitya Sammelan : समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा अधिकार असून, शिक्षण हेच समाजाच्या परिवर्तनाचे मुख्य साधन असल्याचे सयाजीराव गायकवाड यांनी ओळखून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
साहित्य व सुधारणा यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे प्रतिपादन साहित्यिक बाबा भांड (छत्रपती संभाजीनगर) यांनी केले. (Literary Baba Bhand statement Education is tool for social transformation jalgaon news)
ते ‘सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान’ यावर आधारित परिसंवादात अध्यक्ष म्हणून बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ना. धों. महानोर सभामंडप दोनमध्ये आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
या वेळी प्रा. तुषार चांदवाडकर व प्रा. रमेश माने (अमळनेर) यांनी सहभाग घेतला. या वेळी सयाजीराव गायकवाड यांच्या सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानावर चर्चा झाली.
सयाजीराव गायकवाड यांनी हजारो पुस्तके प्रकाशित करण्यासाठी साहित्यिकांना सहकार्य केले. त्या काळात त्यांनी पुस्तके व ग्रंथ यांची बैलगाडी पाठवून पुस्तके एका गावातून दुसऱ्या गावात पाठवली.
आज तीच संकल्पना फिरते ग्रंथालय म्हणून स्वीकारल्याचे वक्त्यांनी सांगितले. सयाजीराव गायकवाड यांनी सर्वच क्षेत्रांत मोठे योगदान दिले असून, त्यांनी त्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्याचे प्रतिपादन केले. प्रा. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.