जळगाव : पहूर (ता.जामनेर) येथील ज्वेलर्स (Jewellery) दुकान फोडून ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या तीन संशयिताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
तिघांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Local Crime Branch arrests 3 suspects who broke into jewellery shop stolen goods worth Rs 45000 jalgaon crime news)
जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्यात ९ फेब्रुवारीला ज्वेलर्स दुकान फोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयितांना शोध घेण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलिस विजयसिंह पाटील, संदीप पाटील, अशरफ निजामुद्दीन, सुधाकर अंभोरे, सुनील दामोदरे, प्रवीण मांडोळे, रवींद्र पाटील, अविनाश देवरे, प्रमोद ठाकूर आदींचे पथक तयार केले.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
पथकाने धरणगाव शहरातून संशयित गजानन सोपान शिंगाडे (वय-३२ रा. वडगाव ता. जि. जालना), कतारसिंग गुरुकसिंग जुनी (वय-१९) आणि बलदेवसिंग बापूसिंग जुनी (वय-२२ दोन्ही रा. रा. धरणगाव) या तिघांना अटक केली.
तिघांनी पहूर येथील ज्वेलर्स दुकान फोडल्याची कबुली दिली. अटकेतील संशयितांनी धरणगाव पोलिस ठाण्यासमोरच एक घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.