Loksabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान भाजप खासदार रक्षा खडसे यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ खडसे त्यांच्या पक्षाच्या धोरणानुसार काम करतील मी माझ्या पक्षाच्या धोरणानुसार काम करेल, असे रक्षा खडसे म्हणाल्या. एकनाथ खडसे माझे वडील आहेत, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
रावेरमध्ये सासरा-सुनेत लोकसभा निवडणुकीत लढाई होणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. एकनाथ खडसे माझे वडील असून ते राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यासंदर्भात मी जास्तू बोलू शकत नाही. तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मात्र मी भाजपची खासदार असून मला पक्षाने संधी दिली तर मी तिसऱ्यांदा रावेर लोकसभा निवडणूक लढवणार, असे रक्षा खडसे म्हणाले.
सासरा-सुनेत संघर्ष -
संघर्ष नक्की राहणार आहेत. नाथाभाऊ माझे वडील आहे. त्यांनी अनेक वर्ष मला साथ दिली पण आज जी परिस्थिती आली आहे. त्यांनी राष्ट्रीवादीत जाण्याचा निर्णय स्वत: घेतला. माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी माझे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. कुणाला मतदान करायचे हे जनता ठरवणार आहे. आमचा कौटुंबीक संबंध तर राहणार आहे. पण राजकीय परिस्थितीला नाथाभाऊ आणि मला देखील सामोरे जाव लागेल.
मराठा आरक्षणावरुन देखील सासरा-सुनेत जुंपल्याची चर्चा -
संसदीय कायद्यात दुरुस्ती करा आणि मर्यादा वाढवून ५० टक्क्याच्या वर आरक्षण द्यावे. लोकसभेच्या अधिवेशनात घटनादुरुस्ती करणार आणि मराठा समाजाला आरक्षण देणार हे सरकारने जाहीर करावे, असे एकनाथ खडसे म्हणाले होते. यावर रक्षा खडसे यांनी उत्तर दिले होते.
"मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. आरक्षण कसं देता येईल. याबाबत चर्चा झाली आहे. याप्रकरणात राजकारण न करता समाजाला कसा न्याय देता येईल याबाबत प्रयत्न केले पाहीजेत", असे रक्षा खडसे म्हणाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.