Longest Day Of Year : खगोलीय घटनांमध्ये सूर्यग्रहण, चंद्रग्रहणासोबतच सर्वांत लहान व सर्वांत मोठा दिवस असेही प्रसंग येत असतात.
त्याचाच भाग असलेला २१ जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस. बुधवारी (ता.२१) हा दिवस तब्बल १३ तास २५ मिनिटांचा असेल, या उलट बुधवारची रात्र सर्वांत लहान असेल. (longest day of year Today is 13 hours 25 minutes day jalgaon news)
पृथ्वी सूर्याभोवती आपली एक फेरी ३६५.२५ दिवसांत पूर्ण करते, ज्याला एक सौर वर्ष म्हणतात. या सौर वर्षात दिवस आणि रात्र एकसारखी नसतात. कधी दिवस लहान किंवा मोठा असतो, तर कधी रात्र. याच बरोबर आपल्याला विविध ऋतू बघायला मिळतात.
असे का होते?
विविध ऋतू आणि दिवस-रात्र एकसमान न राहण्याचे मुख्य कारण पृथ्वीचा २३.५ अंशातून झुकलेला अक्ष (Axis) आहे. पृथ्वीचे मुख्य दोन भाग आहेत, ‘उत्तर गोलार्ध’ (Northern Hemisphere) व ‘दक्षिण गोलार्ध’ (Southern Hemisphere).
पृथ्वी सूर्याभोवती आपली प्रदक्षिणा करीत असताना तिच्या झुकलेल्या अक्षामुळे कधी उत्तर गोलार्ध सूर्यासमोर येतो, तर कधी दक्षिण गोलार्ध.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यामुळे पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश दोन्ही गोलार्धात एकसमान पडत नाही. कधी सरळ, तर कधी तिरपा पडतो. यामुळे दिवस-रात्र लहान मोठी आणि विविध ऋतू आपल्याला बघायला मिळतात.
पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात एकाच वेळी दोन वेगवेगळे ऋतू सुरू असतात. दिवस-रात्रीत होणाऱ्या बदलांची सुरवात पृथ्वी सूर्याभोवती फिरताना चार महत्त्वाच्या बिंदूंवर आली की होते.
जसे २१ मार्च ‘वसंतसंपात बिंदू’ (Spring Equinox), २१ जून ‘विष्टंभ बिंदू’ (Summer Solstice), २२ सप्टेंबर ‘शरदसंपात बिंदू’ (Autumnal Equinox), २२ अवष्टंभ बिंदू (Winter Solstice).
२१ जून ‘विष्टंभ बिंदू’
पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याच्या प्रवासातला २१ जून हा दुसरा महत्त्वाचा बिंदू. याला ‘विष्टंभ बिंदू’ असे म्हणतात. २१ मार्चपासून हळूहळू सूर्यासमोर यायला सुरवात झालेल्या पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त या दिवशी पूर्णपणे सूर्यासमोर आलेले असते. त्या ठिकाणी पडणारा प्रकाश हा सरळ काटकोनात पडतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात २१ जून हा वर्षातील सर्वांत मोठा असतो. म्हणजे १२ तासांपेक्षा जास्तचा दिवस असतो.
या उलट दक्षिण गोलार्ध सूर्यापासून दूर असल्याने त्यावर पडणारा सूर्यप्रकाश तिरपा पडतो. त्यामुळे दक्षिण गोलार्धात २१ जून हा वर्षातला सर्वांत लहान दिवस असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.