Jalgaon News: कमी उंचीचा रेल्वेपूल ठरतोय धोकादायक; कजगावकरांची कसरत

नवीनच तयार करण्यात आलेला रेल्वे पुलाची कमी उंचीमुळे नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे
Motorists passing under the railway bridge at their own risk.
Motorists passing under the railway bridge at their own risk.
Updated on

Jalgaon News : येथील नवीनच तयार करण्यात आलेला रेल्वे पुलाची कमी उंचीमुळे नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. (Low height railway bridge is becoming dangerous jalgaon news)

कजगाव येथील मनमाड कंपनी भागात रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने अनेकांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागते. अनेक वेळा ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना या कमी उंचीच्या पुलामुळे किरकोळ स्वरूपातील दुखापत झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

या रस्त्यावरून कजगावहून वाडे, बांबरुड व अनेक ठिकाणी रस्ता जात आल्याने तसेच या रस्त्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमीन असल्याने शिवाय गावाच्या पलिकडे असलेल्या लोकवस्तीतील नागरिकांना देखील कमी उंचीच्या पुलामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.

Motorists passing under the railway bridge at their own risk.
Jalgaon News: सार्वजनिक बांधकाम ‘ना-हरकत’ अटीनुसार कामे करीत नाही : आयुक्त विद्या गायकवाड

त्यामुळे या पुलाच्या उंचीसंदर्भात योग्य ते उपाय करून नागरिकांची टाळावी, अशी मागणी कजगाव परिसरातून केली जात आहे.

जुन्या पुलाप्रमाणे उंची ठेवावी

दरम्यान, या नवीनच तयार करण्यात आलेल्या पुलाबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने व संबंधितांनी तत्काळ पुलाच्या उंचीबाबत निर्णय घ्यावा, तसेच या पुलाची उंची ही जुन्या पुलाप्रमाणे ठेवण्याची मागणी केली जात आहे. या नवीन पुलाच्या खालून मोटारसायकल देखील जोखीम पत्करून खाली वाकून घेऊन जावी लागते तर बैलगाडी देखील घेऊन जाणे अवघड असल्याने शेतकऱ्यांना देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Motorists passing under the railway bridge at their own risk.
Jalgaon News: खानदेशात डांगर मळे उरले नावालाच; नद्या लुप्त होत असल्याचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.