Jalgaon Lumpy Disease : ‘लम्पी’चे संकट गडद! चाळीसगाव तालुक्यात प्रादुर्भाव; काळजी घेण्याचे आवाहन

Lumpy Disease
Lumpy Disease esakal
Updated on

Jalgaon Lumpy Disease : चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत आता जनावरांवर लम्पी आजाराच्या संकटाने शेतकरी पुरता वैतागला आहे. लम्पी आजराच्या संकटाने दोन वर्षांत तब्बल १८४ जनावरांचा बळी घेतला आहे.

एका महिन्यातच तालुक्यात सुमारे ८३६ जनावरांना लम्पीची लागण झाली होती. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण शंभर टक्के पूर्ण झाले असले तरी या आजाराचा वेग पाहता पशुपालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

तालुक्यात ९८ हजार गोवंशीय पशुधन आहे. पाच सहा महिन्यापूर्वी लम्पी काही प्रमाणात कमी झाले असतानाच गेल्या जुलैपासून पुन्हा लम्पीने डोके वर काढले आहे. (lumpy disease Outbreak in Chalisgaon taluka jalgaon news)

एका महिन्यातच ८३६ जनावरांना लम्पीने बाधित झाली असून, त्यात ५५३ जनावरे उपचारामुळे बरी झाली आहेत. ९८ हजार गोवंशीय जनावराना शंभर टक्के लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

दुष्काळात तेरावा महिना

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरे बाधित होण्याचे तसेच ती दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले असताना आता त्यात लम्पी आजाराने कहर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे.

लम्पी हा आजार एका जनावराकडून दुसऱ्या जनावरांकडे पसरणारा असल्याने प्रत्येक गोवंशीय जनावरांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनावरे मालकांनी लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणासह काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. तालुक्यातील यावर्षी भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळात तेरावा महिना असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

'...स्वच्छ गोठा' मोहीम

पशुसंवर्धन विभागामार्फत 'माझा गोठा, स्वच्छ गोठा' मोहीम राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने लम्पी आजाराच्या अनुषंगाने ही मोहीम सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Lumpy Disease
Jalgaon Lumpy Disease : चाळीसगावात जनावरांना ‘लंपी’ची लागण; पशुपालकांना न घाबरण्याचे आवाहन

तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन विभागातील सर्व कर्मचारी यांनी गोठ्यात जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

दोन वर्षांत १८४ जनावरे दगावली

या वर्षात ७२ तर मागील वर्षात ११२ असे या दोन वर्षात १८४ जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला आहे. लम्पीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण केले गेले. जवळपास शंभर टक्के झाले आहे. लसीकरण केल्यानंतर लसीचा परिणाम व्हायला २१ दिवस लागतात.

या काळात जनावरे अधिक प्रमाणात लम्पीच्या विळख्यात अडकू नये म्हणून पशुधनमालकांनी आपल्या जनावरांवर गाठी आल्या असतील, पाय सुजत असतील तर त्यांनी तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा म्हणजे या जनावरांवर तत्काळ मोफत लसीकरण केले जाईल. तसेच या आजारात दगावलेल्या जनावरांना शासनाच्या निकषाप्रमाणे आर्थिक मदत दिली जाते.

"गोचिड, गोमाशा या कीटकांचा जनावरांना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी गोठ्याची स्वच्छता असणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पशुपालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. लम्पीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत." - संदीप भट, पशुधन अधिकारी, चाळीसगाव

Lumpy Disease
Jalgaon Lumpy Disease : पारोळा तालुक्यात ‘लंपी’चा प्रादुर्भाव; पशुपालकांना काळजी घेण्याचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.