Jalgaon Accident News : मेहुणबारेजवळ लक्झरी बस उलटली; प्रवासी चालकाच्या वादामुळे घडलेली घटना

A luxury bus overturned on the side of the road next to a bridge.
A luxury bus overturned on the side of the road next to a bridge.esakal
Updated on

Jalgaon Accident News : मोबाईल चार्जिंगचा पॉइंट बंद पडल्याच्या कारणावरून लक्झरीचालक आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादात लक्झरी बस रस्त्याच्या कडेला उलटल्याची गंभीर घटना चाळीसगाव- मेहुणबारे दरम्यान गिरणा पुलाजवळ घडली.

ही बस बाजूलाच असलेल्या सिमेंटच्या खांबावर उलटली असती तर अपघाताची भीषणता वाढली असती. (luxury bus overturned near Mehunbare jalgaon accident news)

बस उलटताच चालक पळून गेला. बसमध्ये २० प्रवासी होते. या अपघातात चार प्रवाशांना जास्त तर इतरांना किरकोळ मार लागला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एकता ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (क्रमांक- जी. जे. ०१ ईटी ९९०६) ही सोमवारी (ता. २७) रात्री दहाला अहमदाबाद (गुजरात) येथून निघाली. ही बस छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेसातच्या सुमारास मेहुणबारे येथील गिरणा नदीवरील पुलाजवळ आली असता, बसमध्ये चालकाचा काही प्रवाशांसोबत मोबाईल चार्जिंग पॉइंट चालू करण्याच्या विषयावरून वाद सुरू होता.

प्रवासी चालकाला बस थांबवण्याचे सांगत होते. मात्र, चालक ऐकत नव्हता. त्यामुळे काही प्रवासी चालकाच्या केबीनजवळ आले व त्याच्याशी वाद घालत असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. क्षणात काय झाले, हे प्रवाशांनाच कळालेच नाही. बस उलटल्याने प्रवासी अक्षरशः जिवाच्या भीतीने घाबरून गेले. अशाही स्थितीत काही प्रवाशांनी उलटलेल्या बसमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला.

A luxury bus overturned on the side of the road next to a bridge.
Jalgaon Accident News : कंपनीच्या गेटवरच वॉचमनला ट्रकची धडक

अपघात होताच बसचा चालक तेथून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके व महामार्ग पोलिस कर्मचारी महेंद्र अहिरराव, योगेश पवार, संदीप तहसीलदार, अतुल सोनवणे, संदीप पाटील यांना घटनास्थळी पाठवले.

या अपघातात रुबिना बेगम शेख, अबू ताहेर, अबू बखर (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह इतरही काही प्रवासी जखमी झाले. लक्झरी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. याप्रकरणी शेख जावेद शेख जमील याच्या फिर्यादीवरून फरार बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठा अनर्थ टळला

ही लक्झरी बस ज्या ठिकाणी उलटली, तेथून जवळच नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी सिमेंटचे मोठमोठे पिलोर (खांब) उभे केले आहेत. बस या खांबावर उलटली असती, तर या अपघाताची भीषणता आणखीन वाढली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघाताच्या घटनेने काही वर्षापूर्वी खडकी गावाजवळ एस. टी. बसच्या झालेल्या भीषण अपघाताची आठवण झाली.

A luxury bus overturned on the side of the road next to a bridge.
Jalgaon Accident News: पान खाण्यासाठी आले अन्‌ अपघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.