Jalgaon Crime: शिवमहापुराण कथास्थळी चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय; पोलिस बंदोबस्तात मंगळसुत्रांसह पर्स लंपास

Jalgaon Crime: शिवमहापुराण कथास्थळी चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय; पोलिस बंदोबस्तात मंगळसुत्रांसह पर्स लंपास
Updated on

Maha Shiv Puran Katha : वडनगरी फाटा(ता.जळगाव) येथे शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी दोन महिलांचे मंगळसुत्र चोरीला गेल्याची तक्रार समोर आली आहे.

कार्यक्रमस्थळावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २७ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेत तालुका पोलिसांकडे दिले. (Maha Shiv Puran Katha Purse stolen with 2 mangalsutra in jalgaon crime news)

तालुक्यातील वडनगरी फाटा परिसरात मंगळवारपासून (ता.५) श्री शिवमहापुराण कथेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी सकाळपासून कथास्थळी जाण्यासाठी सर्वच मार्गावर मोठी गर्दी उसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पहिल्याच दिवशी महापुराण कथेला प्रचंड गर्दी झाल्याने या गर्दीचा गैरफायदा घेत दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र तोडून चोरटे पसार झाले.

मंगळसूत्र तोडण्यासह महिलेच्या पर्समधून पैसेही चोरीला गेले आहेत. कार्यक्रमस्थळावर संशयितरित्या काही महिला फिरत असल्याचे आढळून येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २७ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Jalgaon Crime: शिवमहापुराण कथास्थळी चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय; पोलिस बंदोबस्तात मंगळसुत्रांसह पर्स लंपास
Nashik Crime: शिवमहापुराण कथेत चोरट्यांनी साधली पर्वणी; 15 महिलांच्या पोती लंपास

त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांची रात्रीपर्यंत चौकशी सुरू असतानाच दोन महिला मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात धडकले होते. कथास्थळावरून एका महिलेची पर्स चोरून नेली. मात्र त्यातील मोबाईल खाली पडला व तो एका जणाला सापडल्याने त्याने संबंधितांशी संपर्क साधून मोबाईलविषयी माहिती दिली.

धुळ्याचा रेकॉर्ड मोडणार..

धुळे येथे पंडीत प्रदिप मिश्रा यांचा कार्यक्रम झाला तेव्हा, मोठ्या प्रमाणावर महिलांचे मंगळसुत्र तोडण्यात आले, काहींच्या पर्स लंपास झाल्यात. संपुर्ण कार्यक्रमात भाविक महिलांच्या गळ्यातून तोडलेल्या मंगळसुत्रांचे वजन दोन किलोपर्यंत पोहचले होते. कार्यक्रमाला जमणारा मोठा जनसमुदाय, महिलांची प्रचंड संख्या पाहता जळगाव शहरातील भुरटे चोर, परप्रांतीय महिला चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून धुळ्यासह इतर ठिकाणच्या चेारीचे रेकॉर्ड या टोळ्या मोडतील की, काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Jalgaon Crime: शिवमहापुराण कथास्थळी चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय; पोलिस बंदोबस्तात मंगळसुत्रांसह पर्स लंपास
Dhule Crime News : श्री शिवमहापुराण कथास्थळी हातसफाई करणारे तिघे ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.