Farmers Debt Relief Scheme : फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 57 हजार शेतकऱ्यांना लाभ; सविस्तर जाणून घ्या

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme latest marathi news
Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme latest marathi newsesakal
Updated on

जळगाव : राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी विशिष्ट क्रमांकांची यादी शुक्रवारी (ता. २३) ५७ हजार २३१ शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme latest marathi news
Farmers Day : अवघ्या २३व्या वर्षी दुमजली गोठा उभारून यशस्वी डेअरी व्यवसाय करणारी 'श्रद्धा'

ही यादी पोर्टलवर प्राप्त झाली आहे. या योजनेंतर्गत विशिष्ट क्रमांकाच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहे, अशा शेतकऱ्यांनी तत्काळ आपले सरकार सेवा केंद्र व सी.एस.सी. केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या करून प्रस्तुत योजनेचा लाभ घ्यावा. विशिष्ट क्रमांकाच्या यादीमध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आजपर्यंत एकूण ४५ हजार ८८ व राष्ट्रीयकृत बँकांचे १२ हजार १४३, असे एकूण ५७ हजार १३१ कर्ज खाती आली आहेत.

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme latest marathi news
Cotton Farmers News : हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी दिला चोप !

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुकानिहाय कर्जखाती अशी : अमळनेर-५४४८, भडगाव-३०६७, भुसावळ-२४२१, बोदवड-९१९, चाळीसगाव-३९६८, चोपडा-३९९८, धरणगाव-३६३०, एरंडोल-२८३२, जळगाव-३९०४, जामनेर-२४४६, मुक्ताईनगर-५८१, पाचोरा-४०९१, पारोळा-४०९१, रावेर-९५९, यावल-२७८३, असे एकूण ४५ हजार ८८.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()