Jalgaon News : जळगाव जिल्हा दूध संघात सत्तेवर असलेल्या मागील एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांनी तब्बल नऊ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा केला होता. तो भरून काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
या वर्षी चार कोटी २४ लाख रुपये नफा मिळवून सहा कोटी ७२ लाखापर्यंत नफा कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. (Mangesh Chavan Statement of Efforts to bring milk union into good shape Jalgaon news )
येत्या वर्षभरात दूध संघाला सुस्थितीत आणले जाईल, असा विश्वास संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जळगाव जिल्हा दूध संघाची पत्रकार परिषद शनिवारी (ता. २) संघाच्या कामगार भवनात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी संचालक रोहित निकम, कार्यकारी संचालक शैलेश मोरखेडे आदी उपस्थित होते.
या वेळी ते म्हणाले, की संघाच्या अध्यक्षपदाची धुरा आपण १८ डिसेंबर २०२२ ला हाती घेतली. या वेळी गेल्या सत्ताधाऱ्यांनी तब्बल नऊ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा केला होता. आपण अनावश्यक खर्चाला कात्री लावून व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ठोस पावले उचलून हा तोटा सहा कोटी ७२ लाखांपर्यंत आणला आहे.
उत्पादकांना राज्यापेक्षा जादा दर
जिल्ह्यात दूध उत्पादकांना संघातर्फे राज्यातील संस्थापेक्षा जादा ३० रुपये ६० पैसे दर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यभरात दूध वाढल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. मात्र राज्यातील इतर दूध संघ यापेक्षाही कमी दर देत आहेत. दूध उत्पादकांना चांगला भाव देण्यात आपण राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आहोत.
तोट्यामुळे भावात फरक नाही
दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या भावफरकाबाबत ते म्हणाले, की भाव फरक आपण ज्याला बोनस म्हणतो तो का दिला गेला नाही, याबाबतदेखील मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. भाव फरक उत्पादकांना १ एप्रिल ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील आर्थिक वर्षात देण्यात येतो.
या आर्थिक वर्षात शेवटचे तीन महिने बारा दिवस वगळल्यास इतर वर्षभराचा कारभार हा मागील संचालक मंडळाने पाहिला आहे. मागील आर्थिक वर्षात संघास मोठा तोटा झाल्याने दूध उत्पादकांना दूध भाव फरक देणे शक्य नाही. मात्र इतर दुग्ध व्यावसायिक व खासगी डेअरीच्या स्पर्धेत किमान एक ते दीड रुपया प्रतिलिटर जास्त अदा केलेले आहेत.
शासनाने दूध उत्पाकाना अनुदान द्यावे
शासनाने दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की आपण याबाबत मंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. शासनाने दूध उत्पादकांना प्रतिलिटरमागे दोन रुपये अनुदान द्यावे, अशी आपण मागणी करणार आहोत.
खडसेंचा जनआक्रोश मोर्चा स्वतःसाठी
एकनाथ खडसे यांनी काढलेल्या जनआक्रोश मोर्चावर टीका करताना ते म्हणाले, की खडसे गौण खनिज व दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणात पूर्णपणे अडकले आहेत. त्यांनी काढलेला जनआक्रोश मोर्चा हा त्यांना व त्यांच्या परिवार वाचविण्यासाठीच होता. शेतकऱ्यांसाठी त्यांनी हा मोर्चा काढलाच नव्हता. खडसे यांचा विकासाचा कोणताही दृष्टिकोन नव्हता, त्यामुळे जिल्ह्याचा कोणताही विकास केला नाही.
आपले त्यांना आव्हान आहे, की त्यांनी विकासावर चर्चा करावी. त्यांचा तीस वर्षांचा कालावधी आपला केवळ तीस महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे त्यांनी त्यावर केव्हाही चर्चा करावी. त्याला आपली तयारी आहे. खडसे यांनी कोणताही विकास केलेला नाही. जळगाव जिल्ह्याला लागलेले ते ग्रहण आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.