पाचोरा : पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Pachora-Bhadgaon Agricultural Produce Market Committee) अशासकीय प्रशासक मंडळ (Non-Governmental Board of Governors) नियुक्तीचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव (District Deputy Registrar of Co-operative Societies) यांनी दिले असून मुख्य प्रशासक पदी माजी आमदार तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप वाघ (Former MLA Dilip Wagh) यांची नियुक्ती झाली असून प्रशासक मंडळात एकूण सात जणांचा समावेश आहे .सोमवारी हे प्रशासक मंडळ पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
(pachora-bhadgaon agricultural market committee board of governors)
पाचोरा- भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर शासनाच्या आदेशान्वये सहकार उपनिबंधक एन के सूर्यवंशी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या आदेश व नियुक्तीस सभापती सतीश शिंदे यांनी खंडपीठात आव्हान दिले. प्रशासक नियुक्तीत दुजाभाव झाला असून जेथे भाजपचे सभापती आहेत त्या बाजार समित्यांवर प्रशासन आणि इतरांना मात्र मुदतवाढ हा प्रकार शिंदे यांनी आव्हान याचिकेत नमूद केला होता .त्याचा निकाल खंडपीठाने (Bench)मार्च 2021 मध्ये दिला व प्रशासक नियुक्ती रद्द करून संचालक मंडळाकडे कार्यभार देण्याचे व मुदतवाढीसाठी सहकार व पणन मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे निकालात नमूद केले होते.
त्याआधारे पुन्हा बाजार समितीचा कारभार सभापती म्हणून सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने स्वीकारला व त्यांनी संचालक मंडळास मुदतवाढ देण्यासाठीचा प्रस्ताव सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे सादर केल्यानंतर सदरचा मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारण्यात आला. त्यामुळे पुन्हा 7 मे 2021 रोजी प्रशासक म्हणून एन के सूर्यवंशी यांनी बाजार समितीच्या कार्यभार स्वीकारला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने व समान न्यायाचे धोरण आघाडी सरकारने स्वीकारल्याने बाजार समितीवर अशासकिय प्रशासक मंडळ नियुक्त करावे व त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकार्यांचा समावेश करावा अशी मागणी झाली.
आमदार किशोर पाटील यांनी तसा प्रस्ताव सहकार व पणन मंत्र्यांकडे सादर केला होता. त्याआधारे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाचे उपसचिव का.गो.वळवी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांना अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी प्रशासक मंडळाने कार्यभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. या प्रशासक मंडळात मुख्य प्रशासक दिलीप वाघ असून मंडळात शिवसेनेचे अॅड अभय पाटील, चंद्रकांत धनवडे व युवराज पाटील.राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत पाटील व माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन कॉग्रेसचे शिवाजी पाटील यांचा समावेश आहे. एकूण सात सदस्य असलेले हे प्रशासक मंडळ जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशान्वये सोमवारी पदभार स्वीकारतील अशी शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.