नोकरी सुटली..तरी नाउमेद झाला नाही, आणि बनला ‘मोबाईल चहावाला’

शहरात कुठेही असला तरी पाच, सात मिनिटात आपल्या छोट्या मोटारसायकलवर तो चहाचा थर्मास घेऊन हजर
नोकरी सुटली..तरी नाउमेद झाला नाही, आणि बनला ‘मोबाईल चहावाला’
Updated on



रावेर : लॉकडाउनमुळे (lockdown) आपली खासगी नोकरी (Job) सुटूनही 'तो' नाउमेद झाला नाही. शहर आणि परिसरातील तब्बल १५ किलोमीटर परिसरातील गावांमध्ये मोटारसायकलवर चहा विकून 'तो' आपला आणि आपल्या कुटुंबाचा (Family) उदरनिर्वाह जिद्दीने आणि चिकाटीने चालवतो आहे. रावेर शहर आणि परिसरात आता त्याची ओळख ‘मोबाईल चहावाला’ अशी झाली आहे. म्हणजे कोणी मोबाईल करून चहाची (Tea) ऑर्डर दिली तरी तो जातो आणि त्याचे कुठेही चहाचे दुकान नाही, तो चहाचा फिरता विक्रेता असल्याने सर्वजण त्याला मोबाईल चहावाला म्हणून ओळखतात. या जिद्दी युवकाचे नाव राहुल राजेंद्र सोनार असे आहे.

( job left youn man started tea business)

नोकरी सुटली..तरी नाउमेद झाला नाही, आणि बनला ‘मोबाईल चहावाला’
खडसेंच्या दारी फडणवीस...अनेकांच्या उंचावल्या भुवया


राहुल येथीलच प्रतिथयश विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स या दुकानात कामाला होता. मात्र, कोरोनाच्या लॉकडाउनमुळे काम बंद पडले आणि तो रिकामा झाला. मात्र, आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला. ‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ या म्हणीप्रमाणे त्याने घरूनच चहा तयार करून एका स्टीलच्या थर्मासमध्ये भरला. सोबत कागदाचे चहा पिण्याचे छोटे ग्लास घेतले आणि ओळखीच्या दुकानांमध्ये जाऊन चहा घेता का असे विचारायला सुरवात केली. कोरोनाच्या काळात चहाच्या टपऱ्याही बंद असल्याने त्याला सुरवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आणि गेल्या सुमारे वर्षभरात प्रतिसाद वाढून तो रावेर शहर आणि परिसरातील सुमारे दोन अडीचशे दुकानात आणि कार्यालयात जाऊन आपला चहा विकतो. असंख्य ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, दुकाने, पोलिस ठाण्यासारखे कार्यालय, पंचायत समिती, विविध हॉस्पिटल्स आदी ठिकाणी त्याला फोन करून 'चहा घेऊन ये' असे सांगितले जाते आणि राहुल शहरात कुठेही असला तरी पाच, सात मिनिटात आपल्या छोट्या मोटारसायकलवर तो चहाचा थर्मास घेऊन हजर होतो आणि चहा वितरित करतो.

दररोज सहाशे कप चहा विक्री

चहाची किंमत ही अन्य स्पर्धक दुकानांच्या तुलनेने अतिशय कमी म्हणजे फक्त पाच रुपये प्रति कप इतकी आहे. दिवसभरात जवळपास पाचशे ते सहाशे कप चहा राहुल विकतो. त्यासाठी त्याला पाच, सहा वेळा चहा थर्मासमध्ये घेण्यासाठी घरी जावे लागते. चहा वितरित करण्यासाठी राहुल कुसुंबा, अभोडा, वडगाव, अजंदा, निंबोल आदी गावातही जातो. मात्र, गेल्यावर पेट्रोल खर्च झाले म्हणून चहाची किंमत वाढवत नाही. त्यामुळे लोक खास चहासाठी त्याला बोलवतात आणि राहुलही आनंदाने तिथे जातो.

नोकरी सुटली..तरी नाउमेद झाला नाही, आणि बनला ‘मोबाईल चहावाला’
कोरोनामूळे महामार्ग चौपदरीकरणाला सहा महिन्यांची प्रतीक्षा


आजच्या युवकांसमोर आदर्श
भविष्यात कोरोना संपला आणि लॉकडाउननही संपले तरी आपली 'मोबाईल चहावाला' ही प्रतिमा कायम जपण्याचा आणि हाच व्यवसाय करण्याचा त्याचा मानस आहे. अवघे बारावी शिक्षण झालेला राहुल, त्याची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी यांच्यासह शहरातच राहतो. कोरोनामुळे व्यवसाय बंद पडला असे म्हणत तो रडत बसला नाही तर जीवन जगण्याचा नवा मार्ग शोधून त्याने आजच्या युवकांपुढे एक आदर्श उदाहरण सादर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()