Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलन दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी बसची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडून अनेक ठिकाणी बससेवा बंद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव विभागातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. (maratha reservation bus from Jalgaon division to Chhatrapati Sambhaji Nagar have been cancelled jalgaon news)
आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याने मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व बसगाड्या आता रद्द करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाच्यातर्फे हा निर्णय घेण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले.
आंदोलनाच्या अनुषंगाने बसगाड्यांचे नुकसान केले जात असून हे नुकसान टाळण्यासाठी मराठवाडा अर्थात, छत्रपती संभाजीनगरच्या मार्गाने जाणाऱ्या सर्व बसफेऱ्या मागील तीन दिवसांपासून रद्द करण्यात आल्या आहेत. दिवसभरात साधारण ६६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र जळगाव विभागातून अन्य मार्गावरील फेऱ्या सुरळीतपणे सुरू आहेत.
जळगाव विभागातून तीन दिवसांपासून फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. केवळ एका मार्गावरील फेऱ्या रद्द झाल्यानंतर दिवसभरातून ६६ फेऱ्या रद्दमुळे महामंडळाच्या जळगाव विभागाला दिवसभरात साडेपाच लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अर्थात, मागील तीन दिवसात जळगाव विभागाला सुमारे सव्वाकोटींच्यावर नुकसान झाले आहे.
"मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात बसचे नुकसान केले जात आहे. सुरक्षेच्यादृष्टीने छत्रपती संभाजीनगर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. आंदोलनाची तीव्रता जेथे वाढेल त्याठिकाणी फेऱ्या रद्द केल्या जातील. " - भगवान जगनोर (विभाग नियंत्रक, जळगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.