अमळनेर (जळगाव) : शहराला सदैव इतिहासाची साक्ष देणारा प्रेरणादायी दगडी दरवाजा दोन वर्षांपूर्वी ढासळला आहे. राजकीय खेळामुळे की हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे ऑक्टोबर २०२० पासून कार्यारंभ आदेश देऊनही कामात कुठलीही विशेष प्रगती दिसत नाही. या पार्श्वभूमीवर येत्या दहा दिवसांत युद्धपातळीवर काम सुरू झाले नाही, तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी दिला होता. प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने बुधवारी (ता. १६) युवा कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला फुलांचा हार घालून शहरातील जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (jalgaon-news-amalner-palika-ceo-chair-gandhigiri)
अमळनेर शहराची ओळख असणारा दगडी दरवाजाचा बुरूज गेल्या अनेक महिन्यांपासून ढासळला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकज चौधरी यांनी पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, मुख्याधिकाऱ्यांकडे वेळोवेळी २३ डिसेंबर २०१८ ते २२ जुलै २०१९ या दरम्यान पुरातत्त्व विभागास पूर्वसूचना देत दरवाजा बुरूज ढासळू शकतो, असे पत्र दिले होते. त्यांनतर २४ जुलै २०१९ ला दरवाजाचा उजवा बुरूज ढासळला. पाठपुरावा करून काम करण्यास भाग पाडले होते. परंतु पुन्हा संबंधित कामास हेतुपुरस्सर दिरंगाई होत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. त्यास अनुसरून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
दुरूस्तीसाठी कार्यारंभ मात्र..
दगडी दरवाजाच्या दुरुस्तीसाठी कार्यारंभ आदेश देऊनदेखील कामात आजपर्यंत कुठलीही प्रगती दिसत नाही. प्रशासनाने आजपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने पंकज चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार, सामाजिक कार्यकर्ते प्रा. जयश्री दाभाडे, नाविदभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब संदानशिव, ब्रिजलाल पाटील, राकेश चौधरी, नाजीमभाई मेंबर, भूषण भोई, निखिल पाटील, तेजस पाटील, राजे संभाजी मित्रमंडळ, शिवशक्ती मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी पालिकेला भेट दिली. त्या वेळी मुख्याधिकारी अनुपस्थित होत्या. त्यामुळे गांधीगिरी करत मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला फुलांचा हार घालण्यात आला.
उद्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन
या वेळी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. उद्यापासून शहरातील विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी बांधवांसोबत चर्चा करून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. अंदरपुरा, सराफ बाजार पानखिडकी, वाडी चौक, कसाली मोहल्ला भागातील नागरिकांसाठी पायी जाण्यासाठी रस्ता सुरू करण्यात यावा, अशीदेखील मागणी करण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.