विद्यार्थिनीवर अत्याचार.. बाळाच्या डीएनए अहवालाने गुन्हा सिद्ध; आरोपीस दहा वर्षांची शिक्षा

crime
crime
Updated on

जळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमजाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आला. मात्र पीडितेने बाळास जन्म दिल्यावरही लग्नास नकार दिला. पोलिसांत दाखल गुन्ह्यात संशयिताविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आररोपीस दहा वर्षे सश्रम तुरुंगवास आणि तीन लाखांचा दंड ठोठावला. 
पीडित व आरोपी दोघे एकाच समाजाचे असून, पीडित २०११-२२ मध्ये जळगावला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहत असताना संशयिताची तिच्यावर नजर पडली. संशयिताने तिच्या मैत्रिणीमार्फत पीडितेशी संपर्क साधून जवळीक साधत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाची हमी देत जुलै २०१४ पासून फेब्रुवारी २०१५ पर्यंत सतत शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित गर्भवती राहिल्यावर संशयित जयकुमार सोनवणे याने लग्नास नकार दिला. 

तरीही नकार अन्‌ पिडीतेने दिली तक्रार
पीडितेने बाळास जन्म दिल्यावरही संशयिताने तिच्याशी लग्न न केल्याने पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. दाखल गुन्ह्यात तपास पूर्ण होऊन पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू होते. ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी सरकार पक्षातर्फे दहा महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष नोंदविली. संशयित जयकुमार याने कशा पद्धतीने प्रेमजाळ्यात ओढले, लग्नाची हमी देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर केलेल्या छळानंतर झालेला त्रास याबाबत अभियांत्रिकीच्या त्या विद्यार्थिनीने घटनाक्रम आपल्या साक्षीत नमूद केला. पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले. 

डीएनए अहवाल ठरला महत्त्वाचा..
पीडितेने जन्म दिलेल्या बाळाचे डीएनए चाचणीसाठी नमुने संकलित करण्यात येऊन शासकिय प्रयोगशाळेने जन्मलेले बाळ संशयित आरोपी जयकुमार सोनवणे याच्यापासून झाल्याचा अहवाल दिला होता. 

पीडितेला तीन लाख..
आरोपी जयकुमार सोनवणे याला दहा वर्षे सश्रम तुरुंगवास आणि तीन लाख रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद व फसवणुकीबाबत सहा महिने तुरुंगवास तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम पीडितेला व बाळास चरितार्थासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला.  

संपादन– राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.