भडगाव (जळगाव) : कोरोनाबाधित (Coronavirus) दिव्यांग रुग्णांवर संपूर्ण मोफत उपचार केल्यामुळे येथील लाइफलाइन कोविड केअर सेंटर चर्चेत आहेच. आता येथील डॉक्टरांनी विविध व्याधी असलेल्या तीन रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन (Remdesivir) व औषधांचा वापर न करता नैसर्गिक उपचार पद्धतीचा अवलंब करून ठणठणीत बरे केल्याने आश्चर्य व कुतूहलाचा विषय ठरला आहे. (bhadgaon-doctor-Cure-Corona-Infections-naturally-treatment)
पाचोरा येथील ७५ वर्षांचे पूनमचंद लाहोटी यांचा सीटी स्कॅन स्कोअर १५/२५ होता, तर किडनीच्या विकारामुळे क्रियाटिनीन ६.९० झाले होते. ऑक्सिजन पातळी ८६ टक्क्यांवर आली होती. अशा स्थितीत त्यांच्यावर उपचार करणे डॉक्टरांपुढे मोठे आव्हान होते. या रुग्णाला कोरोनामुक्त करण्यासाठी आवश्यक इंजेक्शन्स वा औषध दिले तर धोक्याचे ठरू शकले असते. पण डॉ. नीलेश पाटील व डॉ. पल्लवी पाटील दांपत्याने रुग्णांच्या सहमतीने प्रचलित नैसर्गिक पद्धतीने उपचार (Corona Infections naturally treatment Dr. NIlesh and Pallavi patil) करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वजनानुसार नारळपाणी, मोसंबी ज्यूस, विविध फळांचे रस, प्राणायाम, प्रोन व्हेंटिलेशन (पालथं झोपणे) फॅनद्वारे व्हेंटिलेशन, सकारात्मक समुपदेशन यामुळे ते कोणतेही औषध वा इंजेक्शन न घेता बरे झाले. विशेष म्हणजे, त्यांचा किडनीचा विकारही यामुळे बरा झाल्याचे श्री. लोहाटी यांनी सांगितले. नऊ दिवसांनी क्रियाटिनीनची पातळी ६.९० वरून २.९० झाली. ब्लड युरियादेखील १६३ वरून ३४ वर आला.
बालदमा असूनही वाचला जीव
नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील लता देवीदास पाटील (वय ६५) यांना लहानपणापासून दम्याचा विकार जडला होता. तर सतत स्टोरॅाइड्स घेतल्याने शरीर स्थूल झालेले. अशात त्यांना डबल न्यूमोनिया झाला. त्यांचा सीटी स्कॅन स्कोअर १५/२५ होता. ऑक्सिजन लेव्हल ८४ टक्के इतकी होती. या रुग्णासदेखील त्यांच्या बाह्य आजारामुळे इतर इंजेक्शन देणे जिकिरीचे होते. मात्र, लाइफलाइन कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी नैसर्गिक उपचारांच्या (थ्री स्टेप फ्लू डायट)च्या सहाय्याने विविध फळांचा रस, काढे व ओली हळद आहारात दिले. त्यामुळे त्यांना दमा असूनही त्या कोरोनातून मुक्त झाल्या.
कोरोनामुक्तीसह वाचाही परतली
गुढे (ता. भडगाव) येथील रवींद्र मोरे (वय ५०) यांना तीव्र हृदविकाराचा झटका आल्याने तातडीने ॲन्जिओप्लास्टी करावी लागली होती. त्यात त्यांना डबल न्यूमोनियाने ग्रासले. मेंदूतील गाठीच्या संभाव्य धोक्याने त्यांची वाचाही गेली. सीटी स्कॅनचा स्कोअर १८/२५ होता. त्यामुळे त्यांचे कुटुंब तर हवालदिल झालेच. शिवाय त्याच्यांवर न्यूमोनियाचा की मेंदूचा उपचार करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. अगोदरच रुग्णाच्या रोजच्या मूठभर गोळ्यांचा वापर. अशा गंभीर परिस्थितीत हरियाना येथील डॉ. विश्वरूप चौधरी यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक पद्धतीच्या उपचारांचा अवलंब करण्यात आला. त्यांना वजनानुसार नारळपाणी, मोसंबी रस देण्यात आला. ते कोरोनातून मुक्त झाले अन् त्याचबरोबर त्यांची वाचाही शंभर टक्के परतली.
..यांनी केले उपचार
या तिन्ही रुग्णांवर डॉ. नीलेश पाटील, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. गोविंदा पवार, नर्सिंग स्टाफचे शुभम पाटील, संदीप पाटील, प्रवीण पाटील, सागर माळी, राजू मोरे, बाळासाहेब मांडोळे यांनी मेहनत घेतली. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. प्रफुल्ल पाटील, रवींद्र पाटील व श्याम मुसंडे यांनी समपुदेशनाच्या माध्यमातून रुग्णांशी सकारात्मक संवाद साधला व त्यांना धीर दिला. भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॅा. पंकज जाधव यांनी ही वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.