भुसावळ (जळगाव) : कुठल्याही गावात मूलभूत सोयी- सुविधा पुरवण्यासह अनेक विकासात्मक कामे करण्यासाठी त्या गावातील महसुलाची वसुली (Tax recovery) महत्वाची ठरते. मात्र अनेक गावांमध्ये वसुली होत नसल्याची बाब समोर असतानाच तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीने (Gram panchayat) आदर्श पायंडा सुरू केला आहे. दहा हजारांवर ग्रा.पं. थकबाकी भरणाऱ्या ग्रामस्थांना बक्षिसासह वर्षभर मोफत आरओ पाणी देण्याची घोषणा केल्याने या आवाहनाला साकेगावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. (tax recovery sakegaon gram panchayat announce prices)
या योजनेचा शुभारंभ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याहस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी एक लाखाची वसुली देणार्या दहा ग्रामस्थांचा गौरव करण्यात आला. प्रसंगी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, सरपंच पती विष्णू सोनवणे, ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सपकाळे, हिंमत सोनवणे, गजानन कोळी, गजानन पवार, सागर सोनवाल, कुंदन कोळी, सचिन राजपूत, संतोष पाटील, साबीर पटेल, वासेफ पटेल, मुस्लिम समाज बांधवांचे मौलवी तसेच अन्य प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
पहिल्याच दिवशी लाखो रुपयांची वसुली
भुसावळ कोरोना महामारी लक्षात घेता साकेगाव येथील ग्रामस्थांनी चालू वर्षाचा संपूर्ण कर भरल्यास तथा थकीत बाकी भरल्यास विविध सवलती व सुवर्ण बक्षीस योजना हा ग्रामपंचायत प्रशासनाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी ग्रा. पं. प्रशासनाच्या उपक्रमास साथ देत ग्रामस्थांनी लाखावर कराचा भरणा केला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते कर भरणा करणाऱ्यांना पाण्याचा जार व डस्टबिन वाटप करण्यात आले.
कर भरणाऱ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ
ग्रामपंचायत प्रशासन सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. चालू वर्ष २०२१-२२ चा संपूर्ण कर भरल्यास पाच टक्के सूट व वर्षभर दररोज २० लीटर मोफत आरओचे पाणी देण्यात येणार आहे. तसेच १२ ते ३१ मे दरम्यान संपूर्ण कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी लकी ड्रॉ योजना आयोजिली आहे. प्रथम बक्षीस १० ग्रॅम सोन्याची चैन, द्वितीय बक्षीस एक ग्रॅम सोन्याची नथ, तृतीय बक्षीस पाच पैठणी साड्या व ५० जार प्रत्येकी एक उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून लकी टॅक्सधारकांना वाटप करण्यात येणार आहे. १० हजार थकीत बाकी भरणाऱ्या प्रत्येक करधारकास पाण्याचा एक जार भेट म्हणून देण्यात येईल.
तर थकबाकीत पाच टक्के सुट
५० हजारावर संपूर्ण थकीत बाकी भरणाऱ्या ग्रामस्थांना पाच टक्के सूट देण्यात येईल. कर भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक डस्टबिन मोफत देण्यात येईल. अशा विविध भेटवस्तू व डिस्काउंट योजना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांच्या हितासाठी व गावाच्या विकासासाठी निर्माण केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.