खेळता खेळता ओढवला मृत्‍यू; वडिलांना मात्र वेगळाच संशय

खेळता खेळता ओढवला मृत्‍यू; वडिलांना मात्र वेगळाच संशय
child death
child deathchild death
Updated on

चोपडा (जळगाव) : चहार्डी (ता. चोपडा) येथे घरातच तिसऱ्या मजल्यावर झोका खेळत (Child Playing) असताना खाली पडल्याने डोक्याला मार लागून १३ वर्षीय बालकाचा मृत्यू (Child death) झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Child uncal home playing head injured and death)

चहार्डी येथील डांभुर्णीपुरा भागातील मयूरी मेडिकल्सचे संचालक अनिल आत्माराम बाविस्कर यांचा भाचा भाविक नलीन सोनवणे (वय १३) व त्यांची मुलगी, मुलगा हे तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास साडीने बांधलेल्या झोक्यावर खेळत होते. या वेळी भाविक झोक्यावरून खाली डोक्यावर पडल्याने मृत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

child death
माणुसकी..दीड लाखाचे बिल भरण्यासाठी शेती गहाण; डॉक्‍टरांनी रक्‍कम दिली परत

मुलांची आरडाओरड सुरू

मुलांनी आरडाओरड केला असता ही बाब समजली. त्या वेळी भाविक यास दुसऱ्या मजल्यावर आणले. भाविक बडोदा येथील रहिवासी असून, तो मामाकडेच आईसह राहत होता. घटना घडल्यानंतर लागलीच भाविकचे मामा अनिल बाविस्कर यांनी भाविकला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मृत स्थितीत दाखल केले. याबाबतची माहिती पोलिसांत डॉ. पवन पाटील यांनी दिली.

घातपाताचा संशय

भाविक सोनवणे यास चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात होणार होते; परंतु भाविकचे वडील नलिन सोनवणे बडोदा येथे राहतात. ते बुधवारी (ता. १२) सकाळी आले. त्यांनी भाविकच्या शरीराची पाहणी केली असता घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाची मागणी केली. त्यानुसार तेथे शवविच्छेदनानंतर सायंकाळी उशिरा चहार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.