‘चोसाका’ भाडेतत्त्वासाठी सर्वपक्षीयांची वज्रमूठ

‘चोसाका’ भाडेतत्त्वासाठी सर्वपक्षीयांची वज्रमूठ
copda sugar factory
copda sugar factorycopda sugar factory
Updated on

चोपडा (जळगाव) : चोपडा सहकारी साखर (Copda suger factory) कारखान्यावर ‘बुलढाणा अर्बन’चे मुद्दल व्याजासह जवळपास ४७ कोटी रुपयांचे देणे आहे. हे कर्ज कसे फेडायचे? यावर निर्णय काय? याबाबत बुलढाणा येथे सर्वपक्षीय नेत्यांनी ‘बुलढाणा अर्बन’चे (Buldhana arben) संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्यासोबत सांगोपांग चर्चा केली. यावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन श्री. चांडक यांनी दिले असले, तरी पुढील निर्णय ‘बारामती ॲग्रो’वर अवलंबून आहे. (copda sugar factory thunderbolt for all parties for rent)

बैठकीत माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, भाजपचे नेते घनश्याम अग्रवाल, माजी आमदार तथा तापी सूतगिरणी अध्यक्ष कैलास पाटील, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, चोसाका उपाध्यक्ष शशी देवरे, चोसाका माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील, पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, चोसाका संचालक प्रवीण गुजराथी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील यांनी श्री. चांडक यांची बुलढाणा येथे भेट घेत चोसाका भाडेतत्त्वावर देताना ‘बुलढाणा अर्बन’चे चोसाकावर असलेल्या ४७ कोटींच्या रकमेची वनटाइम सेटलमेंट करण्याबाबत चर्चा केली. चोसाकाची आर्थिक सद्यःस्थिती, भाडेतत्त्वावर देताना समोरील पार्टीलाही अडचणी येणार नाहीत, किती रक्कम सुरवातीला भरावी लागेल, उर्वरित रकमेचे किती हप्ते, सदर हप्त्यांची रकमेवर व्याज, यांसह सर्व गोष्टींवर बैठकीत चर्चा करण्यात येऊन श्री. चांडक यांनी सकारात्मकता दर्शवीत सांगोपांग चर्चा केली. चोसाकाला कोणतीच अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही सर्वपक्षीय नेत्यांना दिली आहे. यावर सर्वपक्षीय नेते आता पुढील आठवड्यात ‘बारामती ॲग्रो’चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे व आमदार रोहित पवार यांची भेट घेणार असून, याबाबत सर्वकाही पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून लवकरच संपूर्ण कार्यवाही पूर्ण होऊन चोसाका भाडेतत्त्वावर देण्याबाबत हालचाली सुरू होणार आहेत. चोसाका भाडेतत्त्वावर देण्याबाबत मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी एक वज्रमूठ बांधत चोसाका कसा जिवंत राहील? याकडे लक्ष लागले असून, येत्या गळितात चोसाकाची चाके गतिमान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

copda sugar factory
संतापजनक..आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; झोपलेली असताना पिशव्या पेटवून फेकल्‍या अंगावर

दुसऱ्यांदा बैठक

चोसाका भाडेतत्त्वावर देण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी वज्रमूठ बांधली असून, यावर लवकरच मार्ग निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये पहिली बैठक झाली होती. तद्‌नंतर गुरुवारी (ता. १३) सर्वपक्षीय नेत्यांची बुलढाणा अर्बनच्या संस्थापक अध्यक्षांसोबत दुसऱ्यांदा बैठक घेतली असून, याबाबतची पुढील बैठक बारामती ॲग्रोचे व्हाइस चेअरमन सुभाष गुळवे यांच्याकडून आमदार रोहित पवार यांची अपॉइंटमेंट घेत पुढील आठवड्यात चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चोसाकाचे गळीत सुरू होणार?

२०२१ मध्ये चोसाकाची चाके गतिमान होऊन गळितास सुरवात होण्याची चिन्हे दिसत असली तरी बारामती ॲग्रोचा निर्णय काय होतो? बुलडाणा चोसाकाला किती सहकार्य करेल? शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट, कामगारांचे थकीत वेतन, थकीत पीएफ रक्कम, इतर व्यापारी देणे? यासह चोसाकाला ५० ते ५५ कोटी रुपयांची गरज आहे, हे सर्व शिवधनुष्यासमोरील पार्टी हाती धरणार काय? यावरच चोसाकाचे भवितव्य अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.