भावी पिढी करिअरबाबत ‘ऑफलाइन’च

भावी पिढी करिअरबाबत ‘ऑफलाइन’च
Maha Career portal
Maha Career portalMaha Career portal
Updated on

अमळनेर (जळगाव) : उद्याची भावी पिढी जागृत असली तर देशाचा सर्वांगीण विकास ठरलेला असतो. मात्र, राज्यातील नववी ते बारावीचे सुमारे ३९ लाख ६० हजार ६२२ विद्यार्थी आपल्या करिअरबाबत ‘सिरिअस’ नसल्याचे दिसून आले आहे. यात ४४ लाख ४३ हजार ४२४ पैकी केवळ चार लाख ८२ हजार ८०२ विद्यार्थ्यांनीच शासनाच्या ‘महाकरिअर पोर्टल’च्या (Maha Career portal) मार्गदर्शनाचा फायदा घेतला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक जिल्ह्यांत ९६ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी (Student) याकडे पाठ फिरविली आहे. (corona lockdown school closed student not online education interseted)

Maha Career portal
पहिल्या ट्रकवर कारवाई नाही; अन्‌ तांदूळने भरलेला दुसरा ट्रक पकडला

सध्या राज्यात कोरोनामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद आहेत. अशा वेळेस राज्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअरसंदर्भात मोफत मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरध्वनीद्वारे व्यवसाय मार्गदर्शन (महाकरिअर पोर्टल) व मानसशास्त्रीय समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी योग्य करिअर निवडून भविष्य सुरक्षित करणे गरजेचे होते. मात्र, स्पर्धेच्या युगात सोशल मीडियावर नेहमी ‘ऑनलाइन’ असणारी भावी पिढी, करिअरबाबत मात्र ‘ऑफलाइन’ झालेली दिसून येत आहे.

राज्यात ४२५ समुपदेशक

या उपक्रमाला चालना मिळावी, या उद्देशाने प्रत्येक तालुक्यासाठी एका समुपदेशकाची शिफारस करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात सुमारे ४२५ समुपदेशक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्‍यात संपर्क अधिकारी, मुख्याध्यापक आणि एक साधन व्यक्ती यांची एक टीम स्थापन करून ते विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करीत असतात.

Maha Career portal
सकाळी अकरानंतर रस्त्यावर दिसाल तर..जिल्ह्यात आजपासून ‘क्रॅकडाउन’

प्रमाणवाढीसाठी प्रयत्न

विद्यार्थ्यांचे करिअर पोर्टल वापराचे प्रमाण वाढावे, यासाठी तालुकानिहाय समुपदेशक व तालुका समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार शाळांनी विद्यार्थ्यांसाठी करिअर पोर्टल व समुपदेशन सविधांबाबत ऑनलाइन कार्यशाळांचेही आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कार्यशाळा घेऊन त्यात महाकरिअर पोर्टल व समुपदेशनाबाबतही मार्गदर्शन करण्याचे सुचविण्यात आले आहे.

बॉटम टेन

जिल्हा... एकूण विद्यार्थी......... मार्गदर्शन घेणारे विद्यार्थी... टक्केवारी

लातूर.... १ लाख २५ हजार २८७..... २२७.................. ०.१८

बीड...... १ लाख ४८ हजार ६०६..... ४५५.................. ०.३१

वाशीम... ७१ हजार ९३७............. .२३८.................. ०.३३

रायगड.... ८८ हजार २९२............. ५०३.................. ०.५७

नाशिक...... २ लाख ७ हजार १८१... १,६११................ ०.७८

यवतमाळ... १ लाख २१ हजार ११३... ९६८.................. ०.८०

उस्मानाबाद...... ६८ हजार ००१....... ५९७.................. ०.८८

नंदुरबार......... ५२ हजार ७४८....... ६८१.................. १.२९

जळगाव......१ लाख ६० हजार ५४३.. २५३३................ १.५८

औरंगाबाद... १ लाख ८१ हजार ७१०.. २८८१................ १.५९

टॉप टेन जिल्हे

जिल्हा...... एकूण विद्यार्थी....... मार्गदर्शन घेणारे विद्यार्थी..... टक्केवारी

नागपूर..... १ लाख ८४ हजार ००८.. ९३ हजार ७८७.......... ५०.९७

सोलापूर.... १ लाख ९१ हजार २९४.. ७३ हजार ५०९......... ३८.४३

नगर........ २ लाख १८ हजार ७९९.. ६९ हजार १४९......... ३१.६०

चंद्रपूर...... ८४ हजार १४४........... २४ हजार ३२४.......... २८.९१

गडचिरोली... ३६ हजार १३९........... ६ हजार ७८०.......... १८.७६

अमरावती... १ लाख ३१ हजार १३८.. २४ हजार ५५८......... १८.७३

अकोला...... ८३ हजार ४४४.......... १४ हजार ३५९.......... १७.२१

कोल्हापूर.... १ लाख ७७ हजार ३७१.. २८ हजार ९२२.......... १६.३१

सिंधुदुर्ग...... ३७ हजार ४०३............. ५ हजार ४३९.......... १४.५४

ठाणे.........१ लाख ९८ हजार ८९८.... २४ हजार ०७४.......... १२.१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.