कोरोनाने आई गेली..महिनाभरानंतर डॉक्टर मुलाचाही मृत्यू

कोरोनाने आई गेली..महिनाभरानंतर डॉक्टर मुलाचाही मृत्यू
corona death
corona deathsakal
Updated on

रावेर (जळगाव) : आईच्या मृत्यूनंतर कोरोनायोद्धा (Coronavirus) कुसुंबा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्‍टर मुलाच्‍या मृत्यूची (Corona death) घटना घडली. (coronavirus death in mother agian one month doctor corona death)

corona death
ट्रकचे चाक अचानक निघून धडकले; युवकाचा मृत्‍यू

कुसुंबा बुद्रुक (ता. रावेर) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्ताफ जमशेर तडवी हे रावेर येथे तडवी कॉलनीमागील आदिवासी वसतिगृहातील कोविड सेंटरला नाइट ड्यूटी बजावून घरी परतल्यावर सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले व मेंदूत ताप गेल्याने त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते. त्यांचा उपचार सुरू असताना त्यांच्या आई आशा जमशेर तडवी (ह. मु. दौंड) यांचा येथे कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर डॉ. अल्ताफ यांना जास्त त्रास जाणवू लागला. कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आईच्या निधनानंतर महिनाभराच्या अंतराने मुलगा डॉ. अल्ताफ जमशेर तडवी (वय ४०) यांचे १७ मेस निधन झाले.

वडील, बहिण रूग्‍णालयातच

वडील व बहीण दौंड येथे रुग्णालयात उपचार घेत आहेत. आई, मुलाच्या निधनामुळे समाजात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. अल्ताफ हे तडवी भिल डॉक्टर फाउंडेशन तसेच युवा कृती समितीचे सक्रिय सदस्य होते. फाउंडेशनच्या माध्यमातून ते आदिवासी भागात वैद्यकीय सेवा देण्यास तत्पर तयार असायचे. त्यांच्या जाण्यामुळे फाउंडेशनने एक डॉ. सदस्य गमावला असून, ती पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांना दोन मुले व पत्नी डॉ. सोनल तडवी पशुवैद्यकीय दवाखाना अटवाडे येथे कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.