रावेर (जळगाव) : कोरोनाविरुद्धच्या लढाईत (Coronavirus fight) आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्सेस, कंपाउंडर्स, वॉर्ड बॉईज, सफाई कर्मचारी यांचे योगदान देवासारखेच आहे, पण त्यांच्या बरोबरच रुग्णवाहिका चालकांचीही (Ambulance driver) भूमिका ही देवदूतासारखीच म्हणावी लागेल. ते कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना (Corona positive patient) रुग्णवाहिकेत ठेवण्यापासून ते दुर्दैवाने कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचे अंत्यसंस्कार करण्यात देखील सहभागी होत आहेत. कोरोनाविरुद्धच्या युद्धात या देवदूतांकडे मात्र उपेक्षेने पाहिले जात आहे. (coronavirus fight front line worker ambulance driver)
ग्रामीण रुग्णालयात प्रवेश करताच ३-४ रुग्णवाहिका उभ्या दिसतात. त्यांचे चालक नेहमी अगदी तत्पर उभे असतात. कुठून ग्रामीण भागातून रुग्ण आणायचा असो की गंभीर रुग्णाला येथून जळगाव किंवा अन्य ठिकाणी न्यायचे असो, हे चालक अक्षरशः जीवावर उदार होऊन जबाबदारी पार पाडतात.
तर जावे लागते थेट स्मशानभूमीत
अनेकदा लोक कोरोना पॉझिटिव्ह नातेवाईकांना रुग्णालयामध्ये ठेवतात आणि त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये; म्हणून स्वतंत्र गाडीने सोबत येतात. अशा वेळी रुग्ण सीटवर व्यवस्थित आहे का? त्याला ऑक्सिजन नीट सुरू आहे का? रुग्ण जिवंत आहे का? हे ही चालकाला अधून- मधून पाहावे लागते. दुर्दैवाने रुग्णाचे निधन झाले, तर थेट स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्यात देखील सहभागी व्हावे लागते.
दिवस असो वा रात्र कायम तत्पर
रावेर येथे असलेल्या रुग्णवाहिका चालकांत अंबिका व्यायामशाळा (विनायक महाजन), गुरुवर्य कै. ना. भि. वानखेडे स्मृती रुग्णवाहिका (वासुदेव महाजन), नगरसेवक आसिफ मोहम्मद यांनी दिलेली इकरा युथ संस्थेची रुग्णवाहिका (फिरोज भाई), आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेली रुग्णवाहिका (ललित सपकाळे), गोकुळ करवले, सौ. छायाबाई राजमल पाटील स्मृती रुग्णवाहिका (पवन महाजन) या चालकांकडेही रुग्णवाहिका आहेत. रात्रीचा दिवस करून रुग्णांची ने आण करण्याचे काम ते मिळेल त्या मानधनात करीत आहेत. जळगावला कुठे बेड रिकामे आहेत? कुठे चांगले उपचार होतील? याबाबत देखील रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देत धीर देण्याची जबाबदारी ते पार पाडतात.
प्रसंगी ‘रुग्णवाहिका’ बनते ‘शववाहिका’
अनेकदा कोरोनाने निधन झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाला हात लावायला त्याचे नातेवाईकही तयार होत नाहीत तेव्हा ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार सुनील सूर्यवंशी यांच्या मदतीने हे चालक 'रुग्णवाहिकेला' तेवढ्या वेळेपुरती 'शववाहिका' करून काम भागवितात आणि थेट सरण रचण्याचे कामही करतात. या बदल्यात नातेवाईक देतील ते मानधन आनंदाने स्वीकारतात. या सेवेसाठी त्यांनी कधी कोणाची अडवणूक केल्याची माहिती नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.