जळगाव : कोरोना संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात कालपासून सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनची (Jalgaon lockdown) अंमलबजावणी आज दूसऱ्या दिवशीही दुपारी बारानंतर सुरू होती. पोलिस अधिकारी रस्त्यावर उतरले होते. अकरानंतर अनेक फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने सुरूच ठेवली होती. त्यावर महापालिकेच्या (Jalgoan corporation) अतिक्रमण विभागाने कारवाईकरीत भाजीपाला, फळे व साहित्य केले. यामुळे बाजारात काही वेळ पळापळही झाल्याची घटना घडली. (jalgaon news coronavirus lockdown but people on road full day)
पोलिसांनी आजही येणाऱ्या जाणाऱ्यांची कडक तपासणी केली. फिरण्याचे कारणे, ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्सची तपासणी केली. अनेकांकडे लायसन नसल्याचे दंडही वसूल करण्यात आला. शहरातील टॉवर चौक, एस.पी.कार्यालयासमोर, बळीरामपेठ, सुभाष चौक, आकाशवाणी चौक आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. पोलिस, महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली.
भाजी- फळ विक्री सुरूच
असे असले तरी सायंकाळी चारनंतर काशिबाई उखाजी कोल्हे शाळा, पुष्पलता बेंडाळे चौकाच्या कडेला, कालिकामाता मंदिरापुढील परिसर, पिंप्राळा, रामानंद परिसर, तांबापूरा आदी भागात भाजी व फळविक्रेते विक्री करताना आढळून आले. वास्तविक पाहता सकाळी ७ ते ११ अशी वेळ अत्यावश्यक सेवेतील वस्तू विकण्याची आहे. त्यावेळे व्यतिरिक्त विक्री होताना आढळल्यास पोलिस कारवाई करतात. मात्र या प्रकाराकडे पोलिसांनी हेतूतः दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियम सर्वांसाठी सारखा असावा त्यात भेदाभद नसावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रस्ते ओस पडेनात
कडक लॉकडाऊनचा अर्थ रस्त्यावर शुकशुकाट एखाद दुसरा दिसला तर दिसला. मात्र रस्त्यावर अद्यापही नागरिकांची ये-जा थांबलेली नाही. या-ना कारणाने पोलिसांना चुकारा देत युवक रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. त्यावर कडक कारवाई केली तरच ते घरी बसतील अन्यथा रस्ते ओस पडणार नाही. संसर्गाचे चक्र सुरूच राहील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.