जळगाव : कोरोनाचा संसर्ग (coronavirus) रोखण्यासाठी केलेले लॉकडाउन (Lockdown impact) अनेकांच्या मुळावर आले आहे. प्रामुख्याने आर्थिक नुकसानच सहन करावे लागत आहे. यात सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) बसला आहे. गतवर्षीच्या लॉकडाउनमधून चाके रुळावर आल्यानंतर दुसऱ्या लाटेत एसटीचे उत्पन्न पुन्हा ‘लॉक’ झाले. एसटीचे शेड्यूल थांबले असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीला केवळ ४२ बस (८४ शेड्यूल) सुरू आहेत. (coronavirus-lockdown-impact-parivahan-bus-loss-jalgaon-division)
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC Bus) उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. गतवर्षी साधारण अडीच ते तीन महिने एसटीची चाके जागेवरच थांबून होती. ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, राज्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली आणि लॉकडाउनचे चित्र निर्माण झाले. प्रत्यक्षात लॉकडाउन १५ एप्रिलपासून लागू असले, तरी महामंडळाला कोरोनारुग्ण वाढण्याचा फटका फेब्रुवारीपासूनच जाणवत होता. त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर झाला.
नियमीत होतात आठशे फेऱ्या
कोरोनाच्या लाटेपूर्वी महामंडळाच्या जळगाव विभागातून (MSRTC Jalgaon division) दिवसभरात ८०० च्या जवळपास फेऱ्या होत होत्या. मात्र, कोरोनाचा या शेड्यूलवर परिणाम जाणवू लागला. प्रवासी वाहतूक करताना अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच किंवा मर्यादित संख्येनेच बसमध्ये प्रवेश देण्यात येत होता. याचा परिणाम महामंडळावर झाला. राज्यात सद्यःस्थितीत सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये जळगाव विभागातून केवळ ८४ शेड्यूल होत आहे. यातही धुळ्यापर्यंतची एकमेव फेरी सुरू आहे. अन्य जिल्ह्यांच्या फेऱ्या बंद असून, केवळ तालुक्यापर्यंत फेऱ्या सुरू आहेत.
दहा टक्केही उत्पन्न नाही
पहिल्या टाळेबंदीच्या काळात तीन महिने संपूर्ण बससेवा बंद होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, यात ग्रामीण भागातील बसफेऱ्या पूर्णत: बंद असून, लांब पल्ल्याच्या बसफेऱ्याही रद्द झाल्या आहेत. अर्थात, पूर्वी विभागाला दिवसाला ७० ते ८० लाखांपर्यंत उत्पन्न मिळत होते. आता दर दिवसाला केवळ तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
लॉकडाउनमुळे बसफेऱ्या कमी होत आहेत. यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शिवाय राज्यात लॉकडाउन शिथिल होण्याबाबत चर्चा असून, मंत्रिमंडळात होणाऱ्या चर्चेनंतर म्हणजे १ जूननंतर बसफेऱ्या कशा सुरू ठेवायच्या, या आदेशानुसार शेड्यूल ठरविले जाईल.
-भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.