जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात कडक नियम लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज काढले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार ३० एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत नियम लागू राहणार असून यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान ५ पेक्षा जास्त व्यक्तींना जमावबंदी करण्यात आली आहे. तर शुक्रवार रात्री ८ वाजेपासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात संचारबंदी केली आहे. यात नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक अथवा गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिलेले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारित केले.
अत्यावश्यक सेवांना सुट
हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनीक्स, मेडीकल इन्श्युरन्स कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक, किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य दुकाने (सर्व आठवडे बाजार बंद राहतील), रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बस सेवा (रेल्वे / बस / विमान द्वारे प्रवाशांना रात्री ८ ते सकाळी ७ वाजेदरम्यान प्रवास करण्यास व प्रवासाहून परत येण्यास परवानगी असेल. तथापि संबंधित प्रवासी यांनी रेल्वे/ बस / विमान यांचे वैध असलेले तिकीट सोबत बाळगणे अनिवार्य राहील)
संचारबंदी व नाईट कर्फ्यू
- ५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात येत आहे.
- दर सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हयात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई.
- शुक्रवार रात्री ८ वाजेपासून ते सोमवार सकाळी ७ पर्यंत अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई असेल. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील.
- वरील लागू करण्यात आलेल्या निर्बंधातून मेडीकल व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक यांना सुट राहील. तथापि संबंधितांनी आपले ओळखपत्र सोबत माळगणे अनिवार्य राहील.
सर्व मनोरंजन पार्क, उद्यान, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे, सार्वजनिक मैदाने हे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. तसेच शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपावेतो सार्वजनिक जागेवर वावरतांना सर्व नागरिकांनी जमावबंदी व कोविड-19 निर्देशांचे पालन करावे.
शॉप, मार्केट व मॉल्स
सर्व अनावश्यक दुकाने, मार्केट व मॉल्समधील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने हे सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन सुरु राहतील.
- अत्यावश्यक सेवा देणारे दुकान मालक व दुकानातील सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वया) कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे. तसेच सदर दुकानात कर्मचारी व ग्राहक यांच्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पारदर्शक काच किंवा शिल्ड, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादी सुविधा वापरण्यात याव्यात,
- अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने वगळून इतर बंद असलेल्या दुकान मालकांनी त्यांच्या दुकानात असलेल्या कर्मचा-यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत ४५ वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पारदर्शक काच किंवा शिल्ड, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादी सुविधांची पूर्व तयार करुन ठेवावी. जेणे करुन पुढील टप्प्यात उघडता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.