राजकीय वैरी अन्‌ ‘वयं पंचाधिकम शतम्‌’

राजकीय वैरी अन्‌ ‘वयं पंचाधिकम शतम्‌’
corona
coronacorona
Updated on

जगभरात दीड वर्षापासून कोरोनाच्या वैश्‍विक (Coronavirus) महामारीने मृत्यूचा तमाशा मांडलेला असताना अन्य राष्ट्रांमध्ये त्यावर मात करण्याच्या उपाययोजनांबाबत मतैक्य होऊ शकते, मग आपल्या देशात दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे चित्र का दिसू नये? एकमेकांवर टीका, आरोप करण्याच्या स्पर्धेपेक्षा (Political leader) सर्वसामान्यांना मदत करण्याची, त्यांना आरोग्य सुविधा मिळवून देण्याची स्पर्धा कधी होणार? संकटाचा सामूहिक मुकाबला करण्यासाठी ही मंडळी ‘वयं पंचाधिकम‌ शतम्‌’चा प्रचिती कधी दाखवेल? (coronavirus political leader not fight team)

कोरोना संसर्गाच्या आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणाच्या बाबतीत देशाची, राज्याची व पर्यायाने जिल्ह्याची स्थिती वेगळी नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नेते कोरोनासंबंधी उपचार वा सुविधांवरून एकमेकांवर चिखलफेक करत असतील तर तेच चित्र राज्यात आणि वर देशातही दिसतेय.

corona
पावरी भाषेतील शॉर्ट फिल्‍म; लसीकरणाबाबत जनजागृती, सोशल मिडीयावर व्हायरल

खरेतर मार्च २०२० पासून सुरू झालेला भारतातील कोरोनाचा संसर्ग जुलै, ऑगस्टपर्यंत ‘पीक’वर पोचून पुढे कमी होऊन जानेवारी २०२१ पर्यंत ओसरत गेला. पण, तो पूर्णपणे मिटला नव्हता. तो नियंत्रणात आल्याच्या स्थितीत बेफिकिरी वाढून पुन्हा संसर्ग वाढू लागला. पहिल्या लाटेत ज्या राज्याची सर्वाधिक हानी झाली, त्याच महाराष्ट्रातून दुसरी लाट सुरू झाली, हे राज्यकर्त्यांसाठी आणि अर्थात विरोधक व नागरिकांसाठी लाजिरवाणे म्हणावे लागेल. सध्या राज्यात संसर्गाचा आलेख स्थिर होऊन पंतप्रधानांकडून स्थिती हाताळण्याबाबत कौतुक होत असले तरी राज्याने गेल्या दोन महिन्यांत त्याची किती किंमत मोजली, हे वेगळे सांगायला नको.

परंतु, या संपूर्ण स्थितीत सत्ताधारी असो की विरोधक, स्थानिक असो की राज्य पातळीवरील नेते, सर्वांनीच अत्यंत घाणेरडे राजकारण केले, हे कुणीही नाकारू शकत नाही. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे कठीण, बेड मिळाला तर ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन उपलब्ध झाला तर आयसीयू, व्हेंटिलेटरचा अभाव अशा स्थितीत या सुविधा मिळवून देण्यासाठी स्पर्धा होण्याऐवजी राजकीय वक्तव्यांची स्पर्धा होणे हे मजबूत लोकशाहीचे लक्षण नाही.

corona
लाखोचा माल करायचे खरेदी; बदल्‍यात रकमेचा द्यायचे चेक, पण त्‍यांची चालाखी उघड

काळाबाजारात सामान्‍य वेठीस

रेमडेसिव्हिर, ‘टॉसिलिझुमॅब’चा काळा बाजार असो, की बेडसाठी लाखो रुपयांची मोजदाद... बेड, इंजेक्शन मिळाले नाही म्हणून कुणी राजकारणी दगावल्याचे ऐकीवात नाही. मात्र, या उपचारांअभावी अनेक सामान्यांना जीव गमवावा लागला, हे नक्की.

आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यातील अपयशाचे खापर सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर फोडत असताना यंत्रणा सक्षम होईल, असे प्रयत्न काही अपवाद वगळता कुणीच केले नाही. मग, उत्तर महाराष्ट्रातील सर्वच मंत्री निष्क्रिय ठरल्याचा गिरीश महाजनांचा आरोप किंवा पश्‍चिम बंगालच्या प्रचारात महाजन जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून महिनाभर फरारी होते हे गुलाबभाऊंचे म्हणणे... हे एकाच वृत्तीचे लक्षण.

मग राजकीय टीम इंडिया व्‍हावी

‘आयपीएल’मध्ये लढताना विराट, रोहित, धवन आदी भलेही एकमेकांविरोधात आग ओकत असतील; पण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते ‘टीम इंडिया’चे सदस्य असतात, तसे भानही ठेवतात. कोरोनाविरुद्ध लढताना अथवा देशाच्या प्रगतीसाठी म्हणून गल्ली ते दिल्लीपर्यंत ‘राजकीय टीम इंडिया’ कुठे दिसत नाही. या वैश्‍विक महामारीच्या संकटात पांडव- कौरव असे मिळून ‘वयं पंचाधिकम‌ शतम्‌’ (आम्ही एकशेपाच) आहोत, याचे किमान भानही कुणी बाळगत नाही, हे दुर्दैवच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()