जळगाव : दुचाकीमालकाला कोरोना (Coronavirus) झाला आहे, तो आजारी असल्याने गाडी विकायची आहे, गहाण ठेवायची आहे, असे सांगत अवघ्या दहा हजारांत दुचाकी (Bike robbery) विकून आलेल्या पैशात तीनपत्ती, जुगाराचा नाद भागविण्याचा प्रकार उघड झाला आहे. तशी कबुली अटकेतील (Jalgaon police) पारदर्शी पाटील (२०, रा. पिंपळगाव बुद्रुक, ता. जामनेर) याने दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून चोरीच्या तब्बल १५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे चोरीची सर्व वाहने जळगाव शहरातून चोरून जामनेर, पहूर, साकेगाव परिसरात विक्री (Bike sell) करण्यात आल्या होत्या. (crime news bike robbery police arested)
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अट्टल मोटारसायकल चोरास अटक केली. अटकेतील चोरट्याने जळगाव शहरातील १५ मोटारसायकली चोरीचे गुन्हे कबूल केले असून, ते उघड झाले आहेत. पारदर्शी पाटील असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली. गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील किशोर राठोड, युनूस शेख, विनोद पाटील, रणजित जाधव, उमेश गिरीगोसावी, शरीफ काझी अशांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयिताला अटक केली.
त्याला पकडण्यासाठी दुचाकीची मागणी
चोरट्याला पकडण्यासाठी त्याच्याकडे सेकंडहँड दुचाकीची मागणीही करण्यात आली होती. पूर्ण पथक गेले पाच दिवस त्याच्या पळतीवर जामनेर तालुक्यातच थांबून होते. पारदर्शी पाटील हा चोरटा पिंपळगाव बुद्रुक येथून पहूरच्या दिशेने येत असताना शेरी फाट्याजवळ त्याला झडप घालून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने ती मोटारसायकलदेखील हस्तगत करण्यात आली.
जुगाराचा नाद
अटकेतील पारदर्शी याला वाईट संगतीत लागून तो जुगाराच्या नादी लागला होता. घरातून आर्थिक संच बसत नसल्याने सज्जन कुटुंबातील तरुण असल्याने सहजच त्याच्यावर लोकांनी विश्वास टाकला. कधी कोणाला कोरोना झालाय म्हणत कवडीमोल चोरीचे वाहन विकून टाकणे, गहाण ठेवणे असे प्रकार वाढले होते. पकडला जाऊ नये यासाठी एकट्यानेच वाहन चोरून तोच मिळेल त्या दरात विक्री करत होता.
आता वाहन घेणाराही गुन्हेगार
सेकंडहँड दुचाकीच्या नावाखाली चोरट्यांनी त्यांचा धंदा वाढविला आहे. हवी ती मोटारसायकल चोरून आणून देणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. ग्रामीण भागात स्थानिक पोलिस कधी वाहनाची कागदपत्रे तपासत नाहीत म्हणून चोरटे निर्धास्त झाले आहेत. चोरीच्या वाहनांना शेजारील जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशात प्रचंड मागणी आहे. मागणीच थांबली तर वाहनचोऱ्या थांबतील. चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्या संशयितांना येथून पुढे गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार असल्याचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.