डॉक्टरांनाच फसवणुकीची ‘सुई’; क्यूआर कोड स्कॅन करताच सफाई

डॉक्टरांनाच फसवणुकीची ‘सुई’; क्यूआर कोड स्कॅन करताच खात्याची सफाई
online fraud
online fraudonline fraud
Updated on

जळगाव : गणेश कॉलनीशेजारील विजय कॉलनी येथील डॉक्टरची क्यूआरकोड स्कॅन करायला लावून ७३ हजार ५०० रुपयांत ऑनलाइन फसवणूक (Online fraud) झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, संबंधितांनी सैन्यदलात नोकरीला असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून विश्‍वास संपादन केल्यावर गंडवल्याप्रकरणी गुन्हा (Police fir) दाखल करण्यात आला. (jalgaon-news-crime-news-cyber-crime-doctor-bank-account-maney-transfer)

विजय कॉलनी येथे डॉ. मुरलीधर झोपे वास्तव्यास आहेत. त्यांचा पुण्यात फ्लॅट असून, तो त्यांना भाडेकरारावर द्यावयाचा असल्याने त्यांनी जॅक्रेस कॉम या संकेतस्थळावर जाहिरात दिली होती. या जाहिरातीनुसार १९ मेस दुपारी झोपे यांना एकाचा फोन आला. त्याने रणदीपसिंग असे नाव सांगून जम्मू- काश्‍मीरमधील रहिवासी आहे. तसेच सैन्यदलात नाईक पदावर नोकरीला असून, सद्यःस्थितीत ग्वाल्हेर येथे असल्याचे सांगितले. तसेच माझी आता पुणे भोसरीला बदली झाली असून, तुमचा फ्लॅट भाड्याने घ्यावयाचा असल्याने त्यासाठी संपर्क साधल्याचे सांगितले. त्यानुसार झोपे यांनी त्याला दरमहा भाडे व डिपॉझिट रक्कम याबाबत माहिती दिली. संबंधिताने त्याचे पॅनकार्ड व आधारकार्ड, सतेच सैन्यदलातील कॅन्टींग कार्ड झोपे यांना पाठवून विश्‍वास संपादन केला.

online fraud
मंत्र्याने फाईल रोखल्याने रखडले अजिंठा घाटातील काम

क्यूआर कोड स्कॅन करायला सांगून गंडविले

काही वेळाने संबंधिताने झोपे यांना डिपॉझिट जमा करावयाचे असल्याचे सांगत गुगल पे, पेटीएमला लिंक असलेला मोबाईल नंबर पाठविण्यास सांगितले. लेखा विभागातील अधिकारी असल्याचे सांगत संबंधिताने राहुल कुमार याच्याशी ओळख करून दिली व तो पैसे देणार असल्याचे सांगितले. राहुल कुमार नावाच्या व्यक्तीने झोपे यांना क्यूआर कोड पाठविला व तो स्कॅन करा, असे सांगून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले. झोपे यांनी तीन वेळा क्यूआर कोड स्कॅन केला.

तीन वेळा पैसे ट्रान्‍सफर

यादरम्यान त्यांच्या खात्यावर पैसे आले नाही, उलट त्यांच्या खात्यातून तीन वेळा प्रत्येकी २४ हजार ५०० याप्रमाणे ७३ हजार ५०० रुपये राहुल नामक व्यक्तीच्या खात्यावर जमा झाले. त्यानंतर संबंधिताने अजून दुसऱ्या खात्याचा पेटीएम क्रमांक द्या, असे सांगत परत करण्याचे आमिष दिले. झोपे यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फोनवर बोलणाऱ्या रणदीपसिंग व राहुल कुमार या नावाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.