जळगाव : शहरातील टागोरनगरातील रहिवासी असलेल्या डॉक्टरची बजाज फायनान्स (Bajaj finance) कंपनीतून बोलत असल्याचे सांगत सात लाखांचे एज्युकेशन लोन (Education loan) मिळवून देण्याच्या आमिषाने चौघांनी ६२ हजार ४९७ रुपयांची फसवणूक केल्याची घटना ९ डिसेंबर २०२० ते २५ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान घडली. संबंधित व्यक्तींकडून आपली वारंवार फसवणूक केल्याचे निदर्शनास (Cyber crime) आल्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (jalgaon news crime news cyber crime education loan)
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील टॉगोरनगर परिसरात डॉ. अनुपम दंडगव्हाळ कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांनी बीएएमएसचे वैद्यकीय पदवी घेतली आहे. दरम्यान, २०२० मध्ये या पदवीचे शिक्षण घेत असताना, दंडगव्हाळ यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यांनी बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत वेगवेगळ्या प्रकरचे वित्तीय सहाय्य आमची कंपनी करते, असे सांगत तुम्हाला कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या वेळी डॉ. दंडगव्हाळ यांनी सात लाखांचे कर्ज हवे असल्याचे संबंधितांना सांगितले. यानंतर बजाज कंपनीमधून स्वप्नील माणगावकर, आर्या पाटील, संस्कृती राजे या नावाने संबंधितांनी डॉ. दंडगव्हाळ यांना फोन केले. तसेच कर्ज मिळवून देण्यासाठी आधारकार्ड तसे पॅनकार्ड व्हॉट्सॲपद्वारे मागवून संबंधितांनी दंडगव्हाळ यांचा विश्वास संपादन केला.
अशा उकळल्या रकमा
कर्ज मिळवून देण्यासाठी प्रोसेसिंग लागेल म्हणून चार हजार ९९९ रुपये, दहा हजार ५०० रुपये, नऊ हजार ९९९ रुपये, दहा हजार ९९९ रुपये अशा रकमा जमा करण्यास सांगितले. डॉ. दंडगव्हाळ यांनी संबंधितांनी सांगितल्याप्रमाणे गुगल पेद्वारे पैसे पाठविले. पैसे भरल्यावरही एज्युकेशन किट घ्यावयाचे सांगून त्यासाठी ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले व कर्जाचे सात लाख रुपये जमा होतील, असे भासवले.
वर्षभर गंडवले
डॉ. दंडगव्हाळ यांनी ९ डिसेंबर २०२० ते २५ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान या काळात संबंधितांनी सांगितल्यानुसार वेळावेळी असे एकूण ६२ हजार ४९७ रुपये भरले. मात्र कर्ज मिळाले नाही. १८ मार्चला संबंधितांचे फोन बंद झाले. अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने फसवणुकीची खात्री झाल्याने डॉ. दंडगव्हाळ यांनी तीन महिन्यांनंतर शुक्रवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून डॉ. दंडगव्हाळ यांना बजाज कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फोन करणारे स्वप्नील माणगावकर, आर्या पाटील, संस्कृती राजे याच्यासह इतर अशा चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक धनराज निकुंभ तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.