फत्तेपूर (जळगाव) : फत्तेपूरहून विदर्भात जाणाऱ्या राज्यमार्ग क्र. ४४ वर पिंपळगाव चौखांबेगावाच्या काही अंतरावर अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने गर्भवती हरीण तडफडून मृत (Pregnant deer death accident) झाली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. (fattepur-aria-Death-of-a-pregnant-deer-car-accident)
दुचाकीवरून पिंपळगावला जाणारे प्रत्यक्षदर्शी संजय प्रल्हाद दांडगे व प्रकाश देवमन मोरे (वाकडी) यांनी सांगितले, की फत्तेपूरकडून धामणगावकडे भरधाव वेगाने जाणारी कार आली. त्याचवेळेस धरणाकडून (उत्तरेकडून) एक हरीण शिवाराकडे(दक्षिणेकडे) धावत जात होते. वाहनाच्या धडकेत हरीण खाली पडून रोडच्या चारीत घसरले. त्यावेळेस ते जिवंत होते. प्राणी मित्रांनी वन कर्मचारी व पशू वैद्यकिय कर्मचारी यांना कळविले. वनरक्षक व्ही. ए. गायकवाड, पी. बी. काळे येईपर्यंत हरीणीने प्राण सोडला.
दणका लागल्याने गर्भपिशवी फाटली
मृत हरिणीचा पंचनामा केला. हरिण श्रेणी-२ मधील प्राणी आहे. पशू वैद्यकिय अधिकारी राहुल ठाकूर यांनी वनभूमीवर उत्तरीय तपासणी केली असता हरीण चार ते पाच वर्षांची होती. तसेच तिच्या पोटात एक पाडसाचा गर्भ होता. वाहनाच्या धडकेत गर्भावरच दणका बसल्यामुळे गर्भपिशवी फाटली. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर वनभूमीतच हरीणीला दफन करण्यात आले. येथील वनपाल हे जामनेरला राहत असून मृत हरीणीचा पंचनामा होवून शवविच्छेदन व दफन झाले तरी ते आलेच नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.