आग लावणाऱ्यांच्या शोधासाठी बक्षीस; जंगलातील वणव्यावर आता ड्रोनची नजर 

forest watch drone
forest watch drone
Updated on

यावल (जळगाव) : वन विभागामार्फत जंगलात आग लावणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा यांनी दिली आहे. 
वन विभागामार्फत जंगलातील वणवा विषयक विविध उपाययोजना करण्यात येत असून, अत्याधुनिक ड्रोन तंत्राद्वारे देखरेख ठेवण्याबरोबरच स्थानिक रहिवासी व आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियमित बैठका भीतीचित्रे, ध्वनिमुद्र फितीद्वारे जनजागृती करण्यात येत आहेत. वणवा नियंत्रणासाठी अग्निप्रतिबंधक मजुरांची संख्या वाढविण्यात आली आहे. वणवा लावणाऱ्या संशयितांना पकडून देणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 
ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या लगत जंगलात आग लागणार नाही, त्या समितीस अकरा हजाराचे पारितोषिक जाहीर करण्यात येत आहेत. वणवा नियंत्रणासाठी स्थानिक रहिवाशांच्या सक्रिय सहभागासाठी वन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. 

मशिनद्वारे जाळ रेषांची कामे
स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये वन विषयक संवेदनशीलता निर्माण करून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. वणवा नियंत्रणासाठी फायर ब्लोअर ग्रास कटर या मशिनद्वारे जाळ रेषांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जंगल गोष्टीसाठी स्थानिक पोलिस प्रशासनाची देखील मदत घेण्यात येत आहे. राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी वनसंरक्षण तथा जंगल वस्तीसाठी तैनात केली आहेत. वन व नियंत्रणासाठी शीघ्र प्रतिसाद पथके तयार केली असून, आरोपी शोध व कारवाई करण्यात येत आहे. अस्थायी संरक्षण कॅम्प उभारून वणवा देखरेख नियंत्रण व निगराणी करण्यात येत आहे. गस्ती पथकाद्वारे जंगल क्षेत्राचे गोष्टीचे नियोजन वाढविण्यात आलेले आहेत. अग्नि संवेदनशील परिसरात गौण वनोपजाचा संकलन व विक्रीवर निर्बंध घालण्याबाबत गंभीर विचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

वणव्याची कारणे 
जंगलात महू व उत्पादन अधिक लालसेने, गुराखी पुढील हंगामात अधिक गवत उत्पादन होणेच्या अंधश्रद्धेमुळे, लगतच्या भागातील शेत बांधावरील राब जाळणे, नकळत जंगलाच्या दिशेने ठिणगी उडाल्यास, वन्य प्राण्यांच्या शिकार करण्याच्या उद्देशाने, पर्यटक अभ्यागाच्या निष्काळजीपणाने ज्वलनशील पदार्थ वनक्षेत्रात फेकल्याने व अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने होतात अशी आणखीही कारणे आहेत. 

अशी घ्या काळजी 
जंगलात ज्वलनशील पदार्थ फेकू नये, अथवा जवळ ठेवू नये आणि असे करणाऱ्या प्रवृत्तीस परावृत्त करावे. वनालगतच्या परिसरात अथवा वनात वनोपज संकलित करताना पालापाचोळा जाळू नये. रात्री उजेडासाठी टेंभाऐवजी बॅटरी घेऊन जावे. वनालगत शेती बांधावरील काडीकचरा निष्काळजीपणाने जाळू नये. अशा प्रकारची काळजी करणे गरजेचे आहे, असेही श्री. पद्मनाभा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.