जळगाव : शहरातील विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून माल घेवून त्यांना न वटणारे चेक (Fraud) देवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा तालुका पोलिसांनी (Jalgaon police) पर्दाफाश केला. तालुका पोलिसांनी याप्रकरणी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तिघांना अटक केली आहे. (non refundable check for purchase of goods from merchants)
जळगाव शहरातील खोटेनगर येथील अंबिका बिल्डर्स यांच्याकडून प्रदीप मखीजा, राहूल वाधवानी व हरिषकुमार पेशवानी या तिघांनी ६४२ टाईल्सचे बॉक्स खरेदी करुन त्यापोटी दुकान मालकास ७ लाख ६ हजार २०० रुपयांचा जळगावातील युनीयन बँकेचा धनादेश दिला. प्रदीप मखीजा यांच्या नावाचा धनादेश बँकेत वटविण्यासाठी दिला असता, बँकेत रक्कम नसल्याने तो वटला नाही. फसवणुकीची खात्री झाल्यावर अंबिका बिल्डर्सचे संचालक प्रशांत शांतीलाल पटेल (वय ३३, रा. गणपतीनगर) यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापुर्वीही असाच प्रकार
अशाच प्रकारे शहरातील अमर किचन वेअरचे संचालक जगदीश दादूमल मंधान (रा. गणपतीनगर) यांच्याकडून १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे कुकर व स्टील खरेदी करुन संशयितांची फसवणूक केली होती. तसेच ईच्छादेवी चौकातील गोदावरी प्लायवूडचे परेश जगदीश तलरेजा (रा. सिंधी कॉलनी) यांच्याकडून ८९ हजार ६८० रुपये किंमतीचे प्लायवूड खरेदी केले. त्याबदल्यात न वटणारा चेक देवून फसवणूक केली होती.
सापळा रचना अन्
रविवारी जळगाव शहरातील जितेंद्र इलेक्ट्रीकल्स ऍण्ड मल्टी ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक सुशील संपतलाल पिंचा यांच्याकडून संशयित १२० सिलिंग फॅन खरेदी करणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक रविकांत सोनवणे वासुदेव मराठे, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, महेंद्र सोनवणे, अभिषेक पाटील यांच्या पथकासह जितेंद्र इलेक्ट्रीकल्स या दुकानावर सापळा रचला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित प्रदीप माखीजा, राहूल वाधवानी, हरिषकुमार पेशवानी यांना ताब्यात घेतले. तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.