लसीकरणाविरुद्ध बोलणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; ‘आयएमए’ची मागणी

लसीकरणाविरुद्ध बोलणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; ‘आयएमए’ची मागणी
Indian medical association
Indian medical associationIndian medical association
Updated on

जळगाव : कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण (Corona vaccine) हे प्रभावी अस्त्र असून, त्याविरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या संदर्भात प्रस्तावित विधेयक त्वरित पारित करून कायद्याची अंमलबजावणी करावी यांसह अन्य मागण्यांसाठी ‘आयएमए’ने (Indian medical association) आज निषेध दिन पाळला. (jalgaon-ima-doctors-strike-in-corona-vaccine-and-attack-doctors)

Indian medical association
जमिनीत विद्युत प्रवाह; वायरमन व तरूण बचावले, दोन म्‍हशींचा मृत्यू

यासंदर्भात आयएमएच्या जळगाव शाखेने आज निषेध दिन पाळताना विविध मागण्यांचा आग्रह धरला. या प्रसंगी डॉ. सी. जी. चौधरी, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. उल्हास पाटील, डॉ. अनिल पाटील, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. दिलीप महाजन, डॉ. विलास भोळे, डॉ. राजेश पाटील, डॉ. भरत बोरोले, डॉ. तुषार बेंडाळे आदी उपस्थित होते.

...अशा आहेत मागण्या

- डॉक्टरवर हल्ला करणाऱ्यास दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा प्रस्तावित असलेले विधेयक त्वरित पारित करावे

- यासंबंधी खटले जलद गती न्यायालयात चालवले जावेत

- कोविडविरुद्ध युद्धात प्राण गमावलेल्या डॉक्टरांना कोविड हुतात्मा म्हणून ओळखले जायला हवे

- हुतात्मा डॉक्टरांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी

- लसीकरण हे कोरोनाचा प्रसार रोखू शकते. त्यामुळे सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करावे

- जे लोक लसीकरणाविरुद्ध बोलतात त्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्यात यावी

- कोविड १९ नंतर फुफ्फुसातील फायब्रोसिसच्या गुंतागुंत, थ्रोम्बोटिक, बुरशीजन्य संसर्ग वाढत असून त्यासाठी सज्जता हवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.