पावसाची ओढ, जळगाव जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या

पावसाची ओढ, जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या
farmer
farmerfarmer
Updated on

जळगाव : जून सरत आला तरी जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला नसल्याने पेरण्या खोळंबल्या. जिल्ह्यात सरासरीच्या ६७ टक्के पाऊस झाला असून, अद्याप ३२ टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने झालेली पेरणीही वाया जाण्याची शक्यता आहे. (jalgaon-news-kharip-hangam-farmer-waiting-rain-no-crop-plantation)

राज्यात मॉन्सूनचे आगमन अंदाजापेक्षा लवकर झाले. अल्पावधीत मॉन्सूनच्या पावसाने राज्य व्यापले. कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाला. मात्र, खानदेश व पर्यायाने जळगाव जिल्ह्यातही चांगला पाऊस झालेला नाही. जून महिना सरत आला तरी पावसाने या महिन्यातील सरासरी गाठलेली नाही. दररोज पावसाचे वातावरण तयार होते; परंतु पाऊस नेहमीप्रमाणे हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

farmer
धुळे जिल्ह्यात केवळ 22 टक्के पेरणी

६७ टक्केच पाऊस

जून महिन्यात आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात सामान्यत: सरासरी १२३.७ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र पावसाने पाठ फिरविली असून, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८३.२ मिलिमीटरच पाऊस झाला आहे. हा आकडा सरासरीच्या अवघ्या ६७.३ टक्केच आहे.

पेरण्या खोळंबल्या

चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असे आवाहन प्रशासन, कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे जून सरत आला तरी जिल्ह्यात पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. जिल्ह्यात खरिपाचे सामान्य पेरणी क्षेत्र सात लाख ५७ हजार ५१५ हेक्टर असून, २२ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ दोन लाख ३९ हजार ४५२ हेक्टर म्हणजे केवळ ३२ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या. उर्वरित ६८ टक्के क्षेत्र पेरणीशिवाय आहे. त्यामुळे पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

कापूसच मुख्य पीक

साडेसात लाख हेक्टरवरील खरीप लागवड क्षेत्रात सर्वाधिक चार लाख ९३ हजार ६७५ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड होते. ती २२ जूनपर्यंत केवळ दोन लाख १७ हजार ४१५ हेक्टर म्हणजे ४४ टक्के क्षेत्रात झाली होती.

farmer
राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपतर्फे उद्या चक्काजाम

अन्य पिकांची स्थिती

त्याखालोखाल मक्याचे अपेक्षित पेरणीक्षेत्र ८९ हजार ११८ हेक्टर असताना आतापर्यंत केवळ १४ हजार ५०८ (१६ टक्के) क्षेत्रात पेरणी झाली आहे. ज्वारीच्या ४५ हजार १७६ हेक्टर क्षेत्रापैकी दोन हजार ५१ (५ टक्के) क्षेत्रात, तूर, उडीद व मूग या कडधान्याच्या ७८ हजार १३३ हेक्टरपैकी तीन हजार ५१९ हेक्टर (५ टक्के) क्षेत्रात, बाजरीच्या १५ हजार ८९८ पैकी ५७१ हेक्टर (४ टक्के) क्षेत्रात पेरणी झाली आहे.

पेरणीची स्थिती अशी

पीक---- लागवड अपेक्षित--- पेरणी---- टक्के

कापूस---४,९३,५७५-------२,१७,४१५---४४

मका----८९,११८-------१४,५०८-----१६

ज्वारी ----४५,१७६-----२,०५१------४

बाजरी ----१५,८९८-----५७१------४

कडधान्य---७८,१३३-----३,५१९----५

खरीप एकूण---७,५७,५१५--२,३९,४५२--३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.