चालक, ठेकेदारावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्हा; दिघावकरांची अपघातस्‍थळी भेट

pratap dighavkar
pratap dighavkar
Updated on

यावल (जळगाव) : तालुक्यातील किनगाव गावाजवळ अंकलेश्वर- बुऱ्हाणपुर राज्य मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास पपई भरून धुळ्याहुन रावेरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक पलटी झाला. या अपघातात तेरा मजुरांसह २ बालकांचा दुदैवी मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी भेट देत पाहणी केली.
किनगाव गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्‍या भीषण अपघाताने संपुर्ण जिल्‍हा हादरला. मोलमजुरी करणाऱ्या पंधरा जणांवर काळाने घाला घातला. या घटनेचे वृत्त समजताच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर हे तात्काळ निघाले. दुपार दोन वाजेच्या सुमारास किनगाव येथील घटनास्थळी भेट देवुन अपघात झालेल्‍या ठिकाणाची पाहणी केली. दरम्यान यावल येथे पोलीस स्टेशनला जावून अपघाता संदर्भातील माहिती घेवुन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलिस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांना घटनेसंदर्भातील काही सुचना दिल्या. 

सदोष मनुष्‍यवधाना गुन्हा
पत्रकारांशी संवाद साधताना विशेष पोलीस महानिरिक्षक दिघावकर यांनी सांगितले, की या अपघातातील जबाबदार म्हणून आपण आयशर चालक शेख जहीर शेख बदरूद्दीन (रा. रावेर) व पपई व्यापारी अमीन शाह अशपाक शाह (रा. केऱ्हाळा, ता. रावेर) या दोघांविरुद्ध सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येवुन ट्रकचालक व व्यापारी या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहीती दिघावकर यांनी दिली .

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.